Wednesday, December 30, 2020

*पाप कुठे जात असते* ? गंगा नदीत पाप धुतले जाते का???

*पाप कुठे जात असते* ?

     एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल.

पण *गंगा* तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल?

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली.

कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. 

देव त्या ऋषी समोर प्रकट झाला.

*ऋषींनी देवाला विचारले " हे देवा सर्व लोक गंगे मध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते*?"

भगवान म्हणाले की " चल आपण त्या गंगालाच विचारू."

ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"

*गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते*!"

आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता , गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"

*समुद्र* म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"

आता ते लोक *ढगांकडे* गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने *वाफ* बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "

*ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या* रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात *पीक* येत. हे उपजलेले पीक, *अन्न* म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या *मानसिकतेने* माणसाकडून खाल्या जाते , त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "

कदाचित म्हणूनच म्हणतात  *जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन*

*म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात*.

*या करिता अन्न नेहमीच देवाचे अन्नदाता किसान जन्मदाता  नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे*.   

*अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा,  हे अन्न दाता जन्मदाता 🙏🙏 तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे*

*🪔ओम नमो नारायणाय*🚩
.

Sunday, December 6, 2020

https://youtu.be/4RuCJ01Q6HMइंडीयन आयडॉल युवराज मेढे यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏8208361187

https://youtu.be/4RuCJ01Q6HM
इंडीयन आयडॉल युवराज मेढे  यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास  मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏
8208361187

Saturday, December 5, 2020

महा आवास अभियानांतर्गत प्रलंबित घर बांधणीला गती द्यावी -विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार


 
 नागपूर, दि. 26: ग्रामीण भागातील  प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला  महा आवास अभियानास गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले. 
   यावेळी  आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दीपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहाय्यक विकास शाखा सुनील निकम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड,  सहाय्यक आयुक्त कामगार विभाग राजदीप धुर्वे उपस्थित होते. 
 या ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत “ सर्वांसाठी घरे ” या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खाजगी संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे. 
 महा आवास अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण तसेच पंचायत समिती निहाय्य  डेमो हाऊसेस उभारणे  या अभियानात फक्त घर न बांधून देता लाभार्थ्यांला त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी व सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी तसेच जीवनोन्नती उपजीविकेचे साधन देण्यात येईल. 
 या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच 20 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. ग्रामीण बेघरांसाठी महा आवास अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. राज्यात सुमारे 8.82 लक्ष घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठीच विभागस्तरीय कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. या योजनेचा नागरिकांमध्ये  प्रचार, प्रसार व जाणीव जागृती होऊन अभियानाचा हेतू साध्य करण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले.  
 अभियानासाठी जिल्हा पातळीवर पाठपुरावा करुन तसेच वेळोवेळी आढावा घेवून अभियानात येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण घरांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करुन ती पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देण्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 
                                                                          00000

Thursday, November 26, 2020

वायरल कथा, जिसने लिखी भेजी उसको प्रणाम *एक पुरानी कथा जो आज भी बिल्कुल प्रसांगिक है*

*एक पुरानी कथा जो आज भी बिल्कुल प्रसांगिक है* 

*एक राजा को राज करते काफी समय हो गया था।*

*बाल भी सफ़ेद होने लगे थे।*

*एक दिन उसने अपने दरबार में उत्सव रखा और अपने मित्र देश के राजाओं को भी सादर आमन्त्रित किया व अपने गुरुदेव को भी बुलाया।*

*उत्सव को रोचक बनाने के लिए राज्य की सुप्रसिद्ध नर्तकी को भी बुलाया गया।*

*राजा ने कुछ स्वर्ण मुद्रायें अपने गुरु जी को भी दी, ताकि नर्तकी के अच्छे गीत व नृत्य पर वे भी उसे पुरस्कृत कर सकें।*

*सारी रात नृत्य चलता रहा। ब्रह्म मुहूर्त की बेला आई, नर्तकी ने देखा कि मेरा तबले वाला ऊँघ रहा है और तबले वाले को सावधान करना ज़रूरी है, वरना राजा का क्या भरोसा दंड दे दे।*

*तो उसको जगाने के लिए नर्तकी ने एक दोहा पढ़ा -*

...✍
*"घणी गई थोड़ी रही,*
 *या में पल पल जाय।* 
*एक पलक के कारणे,*
 *युं ना कलंक लगाय।"*
...✍

अब इस *दोहे* का अलग-अलग व्यक्तियों ने अपने अनुरुप अर्थ निकाला। 

*तबले वाला सतर्क होकर बजाने लगा।* 
...✍
*जब यह दोहा *गुरु जी* ने* *सुना, तो गुरुजी ने सारी मोहरें उस नर्तकी को अर्पण कर दी।*
...✍
*दोहा सुनते ही *राजकुमारी* *ने  भी अपना *नौलखा हार* *नर्तकी को भेंट कर दिया।*
...✍
*दोहा* *सुनते ही राजा के *युवराज* *ने भी अपना *मुकुट* *उतारकर नर्तकी को समर्पित कर दिया ।*

*राजा बहुत ही अचम्भित हो गया।*

*सोचने लगा रात भर से नृत्य चल रहा है पर यह क्या!

*अचानक *एक दोहे* *से सब  अपनी मूल्यवान वस्तु बहुत ही ख़ुश हो कर नर्तकी को समर्पित कर रहें हैं ?* 

 *राजा* सिंहासन से उठा और नर्तकी को बोला *एक दोहे* द्वारा एक नीच या सामान्य नर्तकी  होकर तुमने सबको लूट लिया।
...✍
*जब यह बात राजा के गुरु ने सुनी तो गुरु के नेत्रों में आँसू आ गए और गुरुजी कहने लगे - "राजा ! इसको *नीच नर्तकी  मत कह, ये अब मेरी गुरु बन गयी है, क्योंकि इसके दोहे ने मेरी आँखें खोल दी हैं*। *दोहे से यह कह रही है कि *मैं सारी उम्र जंगलों में भक्ति करता रहा और आखिरी समय में नर्तकी का मुज़रा देखकर अपनी साधना नष्ट करने यहाँ चला आया हूँ,* *भाई ! मैं तो चला ।" यह कहकर गुरुजी तो अपना कमण्डल उठाकर जंगल की ओर चल पड़े।*
...✍
*राजा की लड़की* *ने कहा - "पिता जी ! मैं जवान हो गयी हूँ। आप आँखें बन्द किए बैठे हैं, मेरा विवाह नहीं कर रहे थे। आज रात मैं आपके महावत के साथ भागकर अपना जीवन बर्बाद करने वाली थी। लेकिन इस *नर्तकी के दोहे ने मुझे सुमति दी, कि जल्दबाज़ी न कर, हो सकता है तेरा विवाह कल हो जाए, क्यों अपने पिता को कलंकित करने पर तुली है ?"* 
...✍
*युवराज ने कहा -* *महाराज ! आप वृद्ध हो चले हैं, फिर भी मुझे राज नहीं दे रहे थे। मैं आज रात ही आपके सिपाहियों से मिलकर आपको मारने वाला था। लेकिन इस *दोहे ने समझाया कि पगले ! आज नहीं तो कल आखिर राज तो तुम्हें ही मिलना है, क्यों अपने पिता के खून का कलंक अपने सिर पर लेता है! थोड़ा धैर्य रख।"*
...✍
*जब ये सब बातें राजा ने सुनी तो राजा को भी आत्म ज्ञान हो गया ।*

 *राजा के मन में वैराग्य आ गया। राजा ने तुरन्त फैंसला लिया -*

*"क्यों न मैं अभी युवराज का राजतिलक कर दूँ।" फिर क्या था, उसी समय राजा ने युवराज का राजतिलक किया और अपनी पुत्री को कहा - "पुत्री ! दरबार में एक से एक राजकुमार आये हुए हैं। तुम अपनी इच्छा से किसी भी राजकुमार के गले में वरमाला डालकर पति रुप में चुन सकती हो।"*

 *राजकुमारी ने ऐसा ही किया और राजा सब त्याग कर जंगल में गुरु की शरण में चला गया ।*
...✍
*यह सब देखकर नर्तकी ने सोचा -* *"मेरे एक दोहे से इतने लोग सुधर गए, लेकिन मैं क्यूँ नहीं सुधर पायी ?"*

 *उसी समय नर्तकी में भी वैराग्य आ गया । उसने उसी समय निर्णय लिया कि आज से मैं अपना नृत्य बन्द करती हूँ*

*"हे प्रभु ! मेरे पापों से मुझे क्षमा करना। बस, आज से मैं सिर्फ तेरा नाम सुमिरन करुँगी ।"*

*lockdown भी काफ़ी निकल चुका है, बस ! थोड़ा ही बचा है*
 *---- आज हम इस दोहे को कोरोना को लेकर अपनी समीक्षा करके देखे , तो हमने पिछले 22 मार्च से जो संयम बरता, परेशानियां झेली , ऐसा न हो कि अंतिम क्षण में एक छोटी सी भूल, हमारी लापरवाही, हमारे साथ पूरे समाज/गाँव/शहर/राज्य को न ले बैठे।*

*आओ हम सब मिलकर कोरोना से संघर्ष करें।* 

*#घणीगई #थोड़ी रही, #या #में #पल-#पल #जाय।* 
*#एक #पलक #रे #कारणे, #युं #ना #कलंक #लगाय।"*

*घर पर रहें ,सुरक्षित रहें व सावधानियों का विशेष ध्यान रखें।*
       🙏🙏🙏🙏🙏

Friday, October 23, 2020

बाप हा बाप असतो,🤕 मन हेलावून टाकणारा वायरल मॅसेज नक्की वाचा मग बाप समजेल🙏

*⚜️👍🏼बाप हा बापच असतो!*
"पंखे,लाईट बंद न करता बाहेर का निघून जाता?"

"टीव्ही चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही.तो पाहिला बंद करा!" 
"पेन स्टँड वर ठेवा,नाहीतर खाली पडेल!"

मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना अजिबात आवडत नसतात. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे.!.

प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्या फार फरकाने हीच गोष्ट असते.!.

काल जोपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं.!.

पण आज त्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं.
"मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार".!.
वडिलांची बोलणी असह्य झालीत,असं त्याला वाटत होतं.!.

*तो मुलाखतीसाठी निघाला.*

"कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे!
                आणि 
*उत्तर आलं जरी नाही तर ठोकून दे" असं सांगून वडिलांनी.!.*

*आज नेहमीपेक्षा जास्त पैसे दिले वडीलांनी...*

मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचला.

*तिथे प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता,दरवाजा पण उघडाच होता.दरवाज्याचं लॕच व्यवस्थित बसवलं नव्हतं, त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता,त्याने तो दरवाजा आपटायचा बंद केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला.*

*आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता.पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता.याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली.स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं.*
 
"पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं.

'तो हळूच जिना चढू लागला.!.

*काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते.त्याला वडिलांचे शब्द आठवले ! पंखे,लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?; आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला.,त्या विचारातच त्याने दिवे बंद केले.*

वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला.!.

त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती.त्याच्या लक्षात आले की ती चटई     दुमडली होती,कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती,त्याने चिडूनच ती चटई सरळ केली.त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते,तर मागील काही ओळी रिक्त होत्या.
*परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते,त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या.*

अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडतांना दिसत होते,त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. 

*"तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला.!."*

मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, *"तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" त्याला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे,किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला.!.* 

"आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले.

 *"आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही,काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही.म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली.!.*  

*"आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी,स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत.!.*, 

*आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले.!.*

*आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे.आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे,या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला.!.*

त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला.

*आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.!.*

*दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छिन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात.!.* 

आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे,तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात.!.

*आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते  आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं.  ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत.आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो; परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते.!.*

आई जेंव्हा म्हातारी होते,तेव्हां ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते; परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो.म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही.!.
  *जिवंतपणी आईवडीलांचा चिडण्यावर,रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर तत्वांवर मनःपूर्वक शांततेने विचार करा आपले खरचं चुकत आहे का? हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा बघा काय हाती लागतयं ?*
*ll🌹🙏जय जिजाऊ 🙏🌹ll*
*•~~~~~~~~~👆~~~~~~~~~•* आलेला मेसेज सुंदर वाटला म्हणून फॉरवर्ड करीत आहे.

Thursday, October 22, 2020

lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे

lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे याचा मार्गदर्शन करणारा छोटा व्हिडिओ अवश्य पहा v आपला वेळ व दगदग  वाचवा##LIC#AGENT#PAY# आपल्या मित्र मंडळीना सुद्धा पाठवा ,सुरक्षित रहा, तरुण तडफदार पाहत रहा, 

Saturday, October 17, 2020

👏 *शेवटची संधी* . 👏* विदर्भ मराठवाडा पुणे शिक्षक व पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०*

👏 *शेवटची संधी* . 👏
* विदर्भ मराठवाडा पुणे शिक्षक व पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०*
राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क मिळवण्यासाठी आपली नोंदणी आवश्य करा. आत्ता नोंदणी करणे झाले अगदी सोपे, आपल्या घरुनच करा नोंदणी.

*आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू  शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.*
Link- https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/

*ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.*
Link-https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

*अधिक माहिती व नोंदणी करताना अडचण असेल तर संपर्क: 
🎓 आपला पदवीधर जनजागरण अभियान  तरुण तडफदार रावेर  🎓9403652599

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...