Wednesday, March 16, 2022

होळीचे अध्यात्मिक पैलू- संत राजिन्दर सिंह जी महाराज

होळीचे अध्यात्मिक पैलू
- संत राजिन्दर सिंह जी महाराज

फाल्गुन महिन्यात सर्वत्र फुले उमलतात तसेच वातावरणात भव्य रंगी-बेरंगी बहर येतो. याच महिन्यामध्ये होळीचा सण फार आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. यात लोक एकमेकांना गळाभेट देउन होळीच्या शुभेच्छा देतात. ज्याप्रमाणे होळी सणाचा बाह्य पैलु म्हणजे एक दिवस होळी पेटवली जाते, तसेच दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग व गुलाल टाकून पारंपारिक पद्धतीने, हा उत्सव साजरा केला जातो. परंतु याचे एक अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे.

या जगात नेहमी एक असे चक्र चालू असते ज्यामध्ये सत्य आणि असत्य यांच्यात नेहमी युद्ध होत असतं. सत्याला दाबून टाकण्यासाठी असत्य खूप प्रयत्न करते, जेणेकरून ते सत्य कोणत्या न कोणत्या प्रकारे लपविले जाईल. परंतु सत्य अशी एक गोष्ट आहे जी कधीही लपून राहत नाही. कारण की पिता परमेश्वर सृष्टीच्या सुरुवाती पासूनच सत्य होते, आजही सत्य आहेत आणि सृष्टीच्या अंतापर्यंत सत्यच राहतील. होळीचा दिवस हे असं प्रतीक आहे - शेवटी सत्याचा विजय आणि असत्याचा नेहमी पराभव होतो.

पूर्ण संतांच्या मताप्रमाणे होळी पेटविण्याचे एक अध्यात्मिक महत्व आहे की आपण आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून सदाचारी जीवन जगावे. तसेच ज्या प्रकारे आपण बाहेर एकमेकांवर रंग व गुलाल टाकून हा उत्सव साजरा करतो, त्याच प्रकारे पूर्ण गुरूंच्या सहाय्याने ध्यान अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी प्रभुचे विविध रंग पाहून आपण होळी खेळूया.

या उत्सवाचा एक अन्य पैलू, एकमेकांना रंग लावणे हा सुद्धा आहे. या उत्सवाला लोक पांढरे कपडे परिधान करतात आणि याच्यात सुद्धा एक अध्यात्मिक पैलू आहे. त्या पांढऱ्या रंगात इतर अन्य रंग सुद्धा सम्मिलीत आहेत. याच प्रकारे परमेश्वर सुद्धा आपल्या अंतरी आहे. ज्याप्रकारे पांढरे रंग, सर्व रंगाचे स्रोत आहे, त्याच प्रकारे परमेश्वर सर्व सृष्टीचा स्रोत आहे.

ज्या प्रकारे होळीतील विविध रंग आपल्या कपड्यांवर अनेक रंगांच्या आकृत्या बनवितात आणि आपण त्या आकृत्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनात एकमेकांचा प्रेमपूर्वक स्वीकार केला पाहिजे. जर आपण एखाद्या देशाचे अथवा समाजाचे सदस्य आहोत, तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारे स्वीकारले पाहिजे, जसे पिता परमेश्वर सर्वांचा स्वीकार करतात.

 चला तर, होळीच्या उत्सवाला आपण सर्व आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून एकमेकांवर प्रेम व भातृभावाचा रंग टाकून, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश प्राप्त करूया.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...