Saturday, July 2, 2022

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, रावेर येथे इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा*



 रावेर /सुयश बोरकर/

मॉडर्न इंग्लिश स्कूल रावेर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला रावेर नगरीचे पोलीस निरीक्षक मा. . कैलासजी नागरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच यशवंत विद्यालय रावेर येथील उपशिक्षक मा. बी डी. पाटील सर, संस्थेचे अध्यक्ष. . आर. जी. पाटील सर, उपाध्यक्ष सतीश पाटील सर, सचिव मा. शैलेंद्र अग्रवाल सर, खजिनदार मा. अकलीम तुराबी सर, माजी अध्यक्ष मा. हरीष गणवानी सर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. एम. आर. अकोले मॅडम, पर्यवेक्षक अनिल पाटील सर, के. जी. विभाग प्रमुख श्री डी. पी. पाटील सर, शिक्षिका सौ. खारे मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता दहावीत शाळेत 96.00% गुणांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन करणारा कु. विवेक चंद्रकांत पाटील व त्याच्या पालकाचा सत्कार पोलीस निरीक्षक श्री कैलासजी नागरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 95.80% गुणांनी द्वितीय क्रमांक मिळवणारे कु. मयंक प्रफुल्ल खडायते व त्यांच्या पालकाचा सत्कार श्री बी. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच कुमारी श्रुती प्रशांत पासे व तिच्या पालकाचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आर. जी. पाटील सर यांनी केला. 95.20% गुणांनी तृतीय क्रमांक मिळवणारा कु.पवन सुरेश पाटील व त्याच्या पालकाचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री सतीश पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. 95.00% गुणांनी यश संपादन करणारी क्रिष्णा रामदास वानखेडे हिच्या पालकाचा सत्कार संस्थेचे सचिव मा. श्री शैलेंद्र अग्रवाल सर यांनी केला, 94.80% गुणांनी यश संपादन करणारी देवयानी सुरेश वानखेडे व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे खजिनदार मा. श्री अकलीम तुराबी सर यांनी केला, 94.60% गुण मिळवणारी कुमारी पूर्वा प्रमोद महाजन व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे माजी अध्यक्ष मा. श्री हरिष गणवानी सर यांनी केला, 94.45% गुण मिळवणारा आशिष युसुफ तडवी व त्याच्या पालकाचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एम. आर. अकोले मॅडम यांनी केला, त्याचप्रमाणे 94.20% गुण मिळवणारी तनुजा दिलीप किनगे व तिच्या पालकाचा सत्कार शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर यांनी केला व 94.00% टक्के मिळवणारा प्रथमेश गणेश मराठे व त्याच्या पालकाचा सत्कार शाळेच्या शिक्षिका उषा पाटील मॅडम व सौ संदिपा पासे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री कैलासजी नागरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले शालेय जीवन प्रवासात विद्यार्थी विविध ज्ञान आत्मसात करत असतात, आधुनिक शिक्षण घेत असतात जसे मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटचा वापर करताना बऱ्याच वेळा विद्यार्थी वेगवेगळ्या ॲपचा वापर करतात त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते विद्यार्थ्यांनी अशा माध्यमाचा योग्य वापर करावा काही अडचणी असल्यास शिक्षकांची मदत घ्यावी अथवा पोलिसांची मदत घ्यावी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे नाते मित्रासारखे असावे विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांना आपल्या अडचणी सांगू शकतात असे मौलिक मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी यांनी केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एम. आर. अकोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात खूप यश संपादन करावे असे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते. यश संपादन करताना जिद्द, धैर्य व चिकाटी लागते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. भारती जिरी मॅडम व सौ दिपाली मेढे मॅडम यांनी केले.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...