Friday, March 6, 2020

नाशिक विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत केऱ्हाळे बु. तालुका रावेर येथील कुमारी आसमा तडवी हीने प्रथम क्रमांक पटकावला

      रावेर दि. ६ ( प्रतिनिंधी ) नाशिक येथे दिनांक ५ मार्च २०२० रोजी  पार पडलेल्या नाशिक विभाग स्तरीय गो गर्ल गाे
स्पर्धेत केऱ्हाळे बु. येथील जि प प्राथमिक शाळा नंबर 2 या शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी आसमा मोहम्मद तडवी या विद्यार्थीनीने 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे ती केर्‍हाळे बुद्रुक येथील  
श्री मोहम्मद तडवी व सायरा तडवी यांची कन्या आहे.
या स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या कुमारी आसमा तडवी हिची 
 राज्यस्तरावर निवड करण्यात आलेली आहे या स्पर्धेत तिला प्रोत्साहित करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र तायडे वर्गशिक्षक श्री शांताराम विचवे श्री मधुकर निळे श्री साहेबराव  चौधरी श्री योगेश पाटील श्री दिलीप सावळे तसेच रावेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री अजित तडवी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री नवाज तडवी साहेब केंद्रप्रमुख श्री प्रभाकर बोंडे श्री मानकर सर क्रीडाशिक्षक श्री ए पी पाटील  सर यांनी सखोल मार्गदर्शन केले

प्रा.सी.एस.पाटील यांची भाजपा तालुका सरचिटणीसपदी निवड


रावेर ‍दि. ६ (प्रतिनिंधी) येथील भाजपा कार्यालयात तालुकाअध्यक्ष राजन लासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रा. सी.एस.पाटील यांची रावेर तालुका सरचिटणीस पदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.त्याचे प्रमाणे पुढील कार्यकारणीची सुध्दा निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे
           रावेर ता.अध्यक्ष अध्यक्ष राजन लासुरकर‍ खिरवड,सरचिटणीस प्रा.सी.एस. पाटील , वाघोड,महेश चौधरी दसनुर,उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, विवरे बु., धनराज पाटील शिंगाडी,विशाल पाटील के-हाळे बु. शांताराम पाटील लुमखेडा,सौ.भावना बोरोले चिनावल,अजय भारंबे सावदा,संजय माळी वाघोदा बु.,चिटणीस उमेश महाजन रावेर,विजय महाजन अजनाड,अमोलखाचणे  निंभोरा,सौ. दिपाली कोळी आंदलवाडी, सौ. गोमती बारेला पाल,सौ स्वाती वाघ मस्कावद,चिटणीस गोपाळ पाटील  विटवा,कोषाध्यक्ष भागवत महाजन सावखेडा, प्रसिध्दी प्रमुख खेमचंद धांडे खानापुर, कार्यालय मंत्री कैलास पारधी रसलपुर, सदस्य सौ. स्वाती परदेशी कोचुर खु., सौ.वर्षा चौघरी थोरगव्हाण, शांताराम पाटील लुमखेडा, रविंद्र महाजन कोचुर,सौ. मनिषा चौधरी वाघोदा खु.,भागवत पाटील कांडवेल,निळकंठ बढे खिर्डी खु.,राजेंद्र पाचपोळे पुनखेडा, सौ.कविता बगाडे शिंगाडी,नगीनदास चौधरी खिरवड,सौ.सोनाली धांडे खानापुर, सौ. आनंदाबाई महाजन पाडळे,निलेश सावळे कर्जोद, प्रविण आजलसोंडे मुंजलवाडी, धनलाल पवार पाल, सौ. शबाना तडवी जिन्सी,मनोज श्रावक रावेर, सौ. योगिता महाजन रावेर, सौ. सुनिता डेरेकर रावेर, यशवंत दलाल रावेर, संदीप पाटील रावेर, सौ.लीलाबाई चौधरी वाघोड,राजेंद्र चौधरी उटखेडा,सुभाष पाटील विवरे खु. सौ.रत्नाबाई महाजन कुसुंबे खु.भुषण राणे रोझोदा, करुणा चौघरी खिरोदा, देवयानी बेंडाळे सावदा,कालु पवार लोहारा, सौ.रंजना भारंबे सावदा, सौ. सविता कासार सावदा, जगदीश बढे सावदा, लक्ष्मण महाजन अहिरवाडी, संदीप टोके चिनावल,रविंद्र महाजन वाघोड, प्रमोद महाजन सावखेडा, अजाबराव पाटील रावेर, सदाशिव कोळी उदळी, लक्ष्मण शिंदे गाते,.नुराद तडवी सावदा, संजय वाघ बलवाडी, चरणसिंग पवार जिन्सी, हिलाल सोनवणे, रावेर, सिकंदर तडवी मोरव्हाल, नितीन पाटील नेहेता, सौ. सुजाता लक्ष्मण माने  सुदगांव, प्रभाकर पाटील के-हाळा,विपिन पाटील धुरखेडा, नितीन पाटील रावेर,याची निवड करण्यात आली.
      या निवडीबाबत मा.आ.गिरीशभाऊ महाजन ,मा.आ.एकनाथरावजी खडसे,जिल्हाध्यक्ष मा.आ.हरीभाऊ जावळे,जि.प. नामदार अध्यक्षा रंजनाताई प्रहाद पाटील, मा.सभापती सुरेशभाऊ धनके,मा.सरचिटणीस विजय धांडे, ‍जिल्हाउपाध्यक्ष डॉ. मिलींद वायकोळे जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी प.स.सभापती माधुरी नेमाडे,तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, शिवाजी पाटील, पं.स.सभापती  जितेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, जि.प. सदस्य व प. स. सदस्य यांनी  नवनियुक्त पदाधिका-याचे अभिनंदन केले.

Thursday, March 5, 2020

दीन विशेष♻१० पैकी आठ जणांना दातांचे आजार

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌞 शुभ प्रभात 🌞
🌹 शुभ दिन शुक्रवार 🌹
🌺 दंतवैद्य दिवस 🌺
🌷 गायिका देवकी पंडीत ज.दिन 🌷
🌸 चरित्रकार,संपादक शि.ल.करंदीकर ज.दिन 🌸
🌻 इटालियन शिल्पकार,चित्रकार मायकेल अँजेलो ज.दिन 🌻
💐 कादंबरीकार रणजित देसाई स्मृतिदिन 💐
💐 गुलाबराव महाराज पुण्यतिथी 💐
0⃣6⃣—0⃣3⃣—2⃣0⃣2⃣0⃣
♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻
१० पैकी आठ जणांना दातांचे आजार
जागतिक पातळीवर सर्वसाधारणपणे ८० ते ९० टक्के लोकांमध्ये प्रामुख्याने दंतक्षय किंवा हिरड्यांचे आजार आढळून येतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यात सरासरी १० पैकी आठ जणांमध्ये दात किंवा हिरड्यांशी संब‌धित आजार आढळून येतात. पण याची वेळीच काळजी घेतली तर मुखरोगांना आळा घालता येतो, असे दातांचे डॉक्टर सांगतात.  
जागतिक पातळीवर सर्वसाधारणपणे ८० ते ९० टक्के लोकांमध्ये प्रामुख्याने दंतक्षय किंवा हिरड्यांचे आजार आढळून येतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यात सरासरी १० पैकी आठ जणांमध्ये दात किंवा हिरड्यांशी संब‌धित आजार आढळून येतात. पण याची वेळीच काळजी घेतली तर मुखरोगांना आळा घालता येतो, असे दातांचे डॉक्टर सांगतात.

जीवनशैलीचा परिणाम
इंडिया डेंटल असोसिएशनने मध्यंतरी देशपातळीवर दातांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण केले होते. त्यात १५ वर्षांच्या खालील ७० टक्के मुलांमध्ये हिरड्यांच्या समस्या आढळून आल्या. जंक फूड, शीतपेय, ब्रश न करण्याच्या सवयी व वेगवान जीवनशैलीमुळे दातांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे आढळून आल्याचे वाशीच्या फोर्टिस रुग्णालयाचे दंतवैद्य डॉ. अजय माथुर सांगतात.

यंदा ‘हेल्दी माऊथ-हेल्दी लाइफ’ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात आला.

जगाच्या तुलनेत भारताचा विचार केल्यास देशात ६० ते ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहातात. तेथे तोंडाच्या आरोग्याविषयी फार जागरूकता नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हिरड्यांचे विकार प्रामुख्याने आढळतात. शहरी भागात तुलनेत मौखिक आरोग्याबाबत जागरूकता असली तरी फास्टफूड, पिझ्झा बर्गर, चॉकलेट पेस्ट्रिज अशांमुळे दंतक्षयाचे प्रमाण अधिक आढळते.

निगा राखा

> जागतिक पातळीवर ७० ते ९० टक्के लोकांमध्ये दंतक्षय
> राज्यात १०पैकी आठ जणांमध्ये विकार
> ग्रामीण भागात हिरड्यांचे विकार अधिक
> ग्रामीण भागात गुटखा, पान तंबाखूमुळे धोका
> शहरात फास्ट फूड-चॉकलेटमुळे दातांना त्रास
> दंतक्षय व हिरड्यांची वेळीच काळजी घ्या
> गोड खाद्यपदार्थ टाळा
> गुटखा, तंबाखू,धूम्रपान वर्ज्य करा
> दिवसातून किमान दोनवेळा ब्रश करा
> दातांची नियमित तपासणी करा

राज्यातील गुटखा, पानमसाले, सुपारीवरील बंदीमुळे तोंडाच्या आरोग्याच्या तक्रारी नक्कीच कमी होतील. लोकांनीही दात व हिरड्यांची काळजी घेण्याची गरज आहे. दंतक्षय व हिरड्यांच्या विकारांना वेळीच प्रतिबंध करण्याची गरज आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

राजधानी एक्सप्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा देण्यात यावा. माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी



काल दि. 4 मार्च रोजी रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांची भेट माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली.

आठवड्यातून चार दिवस 22221/22222 राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वे विभागातून सुरू आहे. राजधानी एक्सप्रेसमुळे जळगाव ते दिल्ली अंतर अत्यंत कमी वेळात पार पडत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी सोय होत असल्याने सदर गाडी रोज सुरू करावी अशी मागणी केली.

राजधानी ट्रेनविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी जळगाव येथे थांबा असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत.
जळगाव स्थानकावर पाणी भरणे, चालक दल बदलणे या सुविधा उपलब्ध नाहीत. या सुविधा जळगाव स्थानकावर उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर वेळ आणि निधीची तरतूद करावी लागेल. जळगाव हे जंक्शन असल्याने पश्चिम रेल्वेकडून नागपूर कडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते. चालक दलास भुसावळ येथून पाठवावे लागते त्याकारणाने भोपाळ येथे एक्सप्रेस पोहोचेपर्यंत त्यांच्या कामाच्या तासात वाढ होते याचा परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुसावळ येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भुसावळ येथे तांत्रिक थांबा दिल्यास वेळ आणि पैश्याची बचत होऊन गाडीला उशीर होण्याची शक्यता नाही. या मुद्द्यांवर विचार करून भुसावळ स्थानकावर 22221/22222 राजधानी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे केली.

जळगाव जिल्ह्यातील 1 लाख 127 शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीआधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे•



  जळगाव, (जिमाका) दि. 4 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करतांना काही तांत्रिक अडचणी येत आहे. त्या सर्व संबंधित बँकांनी तातडीने सोडवाव्यात व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिल्यात. 
  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वय अरुण प्रकाश, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेकरीता 1 लाख 43 हजार 832 शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी 1 लाख 127 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले असून 43705 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी 1833 शेतकऱ्यांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकऱ्याचा विशेष क्रमांकही सादर करावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. 
0000

रावेर रेल्वे स्टेशन वर एका तरुण मुलाचा अपघाती मृत्यू,


रावेर रेल्वे स्टेशन वर आज  अमृतसर दादर एक्स्प्रेस खाली येवून एका तरूण मुलाचा मुत्यू झाल्याचे  कळते   बुऱ्हाणपूर कडून येणाऱ्या अमृतसर दादर पठाणकोट एक्स्प्रेस खाली येवून रावेर चे एका मुलाचा मृत्यू झाला त्याचे सरदभात ग्रामीण रुग्णालयात लोकांनी एकच गर्दी केली होती,,

मुक्ताईनगर मध्ये नाफेड मार्फत तुर खरेदीला सुरुवात....मा.सौ.यामीनीताई चंद्रकांत पाटील यांचे हस्ते तुर खरेदी केंद्राचां शुभारंभ,


दि.5 रोजी मुक्ताईनगर तालुक्यात शेतकर्यांकडून प्रत्यक्षात नाफेड मार्फत तुर खरेदीला सुरुवात करण्यात आली. मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ ली. मुक्ताईनगर येथे नाफेड अंतर्गत तुर खरेदी केंद्राचे उद्घाटन मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते करण्यात येणार होते., परंतु मा.भाऊ अधिवेशना निमित्ताने मुंबईला असल्याने मा.सौ.यामीनीताई चंद्रकांत पाटील यांचे हस्ते मोजणी काट्याचे पुजन करून तुर खरेदीला सुरूवात करण्यात आली. शेतकरी प्रल्हाद परशुराम राणे यांची पहीली तुर यावेळी मा.सौ.यामिनीताई चंद्रकांत पाटील याचे हस्ते मोजणी करुन खरेदी करण्यात आली. तसेच अनेक शेतकर्यांची नोंदणी यावेळी करण्यात आली. शासनाने प्रतिक्विंटल रु. 5,800 एवढा भाव निश्चित केला असून मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ मुक्ताईनगर येथे तुर खरेदीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिनल साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संचालक विलास धायडे, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, शिवसेना महिला जिल्हा संघटीका कल्पना पालवे, नगरसेविका सविता भलभले, शिवसेना तालुका महिला संघटीका शोभा कोळी, अनंतराव देशमुख, स्विय्य सहाय्यक संतोष कोळी, शेतकी संघाचे सभापती प्रभाकर झोपे, दशरथ कांडेलकर, संचालक शांताराम गव्हाळ, मार्केट कमिटी संचालक कैलास पाटील, संघाचे मॅनेजर रतिराम सपकाळे, चंद्रकांत मराठे यांचेसह इतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. 

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...