Wednesday, December 30, 2020

*पाप कुठे जात असते* ? गंगा नदीत पाप धुतले जाते का???

*पाप कुठे जात असते* ?

     एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल.

पण *गंगा* तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल?

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली.

कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. 

देव त्या ऋषी समोर प्रकट झाला.

*ऋषींनी देवाला विचारले " हे देवा सर्व लोक गंगे मध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते*?"

भगवान म्हणाले की " चल आपण त्या गंगालाच विचारू."

ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"

*गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते*!"

आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता , गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"

*समुद्र* म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"

आता ते लोक *ढगांकडे* गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने *वाफ* बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "

*ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या* रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात *पीक* येत. हे उपजलेले पीक, *अन्न* म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या *मानसिकतेने* माणसाकडून खाल्या जाते , त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "

कदाचित म्हणूनच म्हणतात  *जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन*

*म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात*.

*या करिता अन्न नेहमीच देवाचे अन्नदाता किसान जन्मदाता  नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे*.   

*अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा,  हे अन्न दाता जन्मदाता 🙏🙏 तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे*

*🪔ओम नमो नारायणाय*🚩
.

Sunday, December 6, 2020

https://youtu.be/4RuCJ01Q6HMइंडीयन आयडॉल युवराज मेढे यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏8208361187

https://youtu.be/4RuCJ01Q6HM
इंडीयन आयडॉल युवराज मेढे  यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास  मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏
8208361187

Saturday, December 5, 2020

महा आवास अभियानांतर्गत प्रलंबित घर बांधणीला गती द्यावी -विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार


 
 नागपूर, दि. 26: ग्रामीण भागातील  प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला  महा आवास अभियानास गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले. 
   यावेळी  आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दीपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहाय्यक विकास शाखा सुनील निकम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड,  सहाय्यक आयुक्त कामगार विभाग राजदीप धुर्वे उपस्थित होते. 
 या ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत “ सर्वांसाठी घरे ” या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खाजगी संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे. 
 महा आवास अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण तसेच पंचायत समिती निहाय्य  डेमो हाऊसेस उभारणे  या अभियानात फक्त घर न बांधून देता लाभार्थ्यांला त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी व सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी तसेच जीवनोन्नती उपजीविकेचे साधन देण्यात येईल. 
 या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच 20 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. ग्रामीण बेघरांसाठी महा आवास अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. राज्यात सुमारे 8.82 लक्ष घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठीच विभागस्तरीय कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. या योजनेचा नागरिकांमध्ये  प्रचार, प्रसार व जाणीव जागृती होऊन अभियानाचा हेतू साध्य करण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले.  
 अभियानासाठी जिल्हा पातळीवर पाठपुरावा करुन तसेच वेळोवेळी आढावा घेवून अभियानात येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण घरांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करुन ती पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देण्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 
                                                                          00000

Thursday, November 26, 2020

वायरल कथा, जिसने लिखी भेजी उसको प्रणाम *एक पुरानी कथा जो आज भी बिल्कुल प्रसांगिक है*

*एक पुरानी कथा जो आज भी बिल्कुल प्रसांगिक है* 

*एक राजा को राज करते काफी समय हो गया था।*

*बाल भी सफ़ेद होने लगे थे।*

*एक दिन उसने अपने दरबार में उत्सव रखा और अपने मित्र देश के राजाओं को भी सादर आमन्त्रित किया व अपने गुरुदेव को भी बुलाया।*

*उत्सव को रोचक बनाने के लिए राज्य की सुप्रसिद्ध नर्तकी को भी बुलाया गया।*

*राजा ने कुछ स्वर्ण मुद्रायें अपने गुरु जी को भी दी, ताकि नर्तकी के अच्छे गीत व नृत्य पर वे भी उसे पुरस्कृत कर सकें।*

*सारी रात नृत्य चलता रहा। ब्रह्म मुहूर्त की बेला आई, नर्तकी ने देखा कि मेरा तबले वाला ऊँघ रहा है और तबले वाले को सावधान करना ज़रूरी है, वरना राजा का क्या भरोसा दंड दे दे।*

*तो उसको जगाने के लिए नर्तकी ने एक दोहा पढ़ा -*

...✍
*"घणी गई थोड़ी रही,*
 *या में पल पल जाय।* 
*एक पलक के कारणे,*
 *युं ना कलंक लगाय।"*
...✍

अब इस *दोहे* का अलग-अलग व्यक्तियों ने अपने अनुरुप अर्थ निकाला। 

*तबले वाला सतर्क होकर बजाने लगा।* 
...✍
*जब यह दोहा *गुरु जी* ने* *सुना, तो गुरुजी ने सारी मोहरें उस नर्तकी को अर्पण कर दी।*
...✍
*दोहा सुनते ही *राजकुमारी* *ने  भी अपना *नौलखा हार* *नर्तकी को भेंट कर दिया।*
...✍
*दोहा* *सुनते ही राजा के *युवराज* *ने भी अपना *मुकुट* *उतारकर नर्तकी को समर्पित कर दिया ।*

*राजा बहुत ही अचम्भित हो गया।*

*सोचने लगा रात भर से नृत्य चल रहा है पर यह क्या!

*अचानक *एक दोहे* *से सब  अपनी मूल्यवान वस्तु बहुत ही ख़ुश हो कर नर्तकी को समर्पित कर रहें हैं ?* 

 *राजा* सिंहासन से उठा और नर्तकी को बोला *एक दोहे* द्वारा एक नीच या सामान्य नर्तकी  होकर तुमने सबको लूट लिया।
...✍
*जब यह बात राजा के गुरु ने सुनी तो गुरु के नेत्रों में आँसू आ गए और गुरुजी कहने लगे - "राजा ! इसको *नीच नर्तकी  मत कह, ये अब मेरी गुरु बन गयी है, क्योंकि इसके दोहे ने मेरी आँखें खोल दी हैं*। *दोहे से यह कह रही है कि *मैं सारी उम्र जंगलों में भक्ति करता रहा और आखिरी समय में नर्तकी का मुज़रा देखकर अपनी साधना नष्ट करने यहाँ चला आया हूँ,* *भाई ! मैं तो चला ।" यह कहकर गुरुजी तो अपना कमण्डल उठाकर जंगल की ओर चल पड़े।*
...✍
*राजा की लड़की* *ने कहा - "पिता जी ! मैं जवान हो गयी हूँ। आप आँखें बन्द किए बैठे हैं, मेरा विवाह नहीं कर रहे थे। आज रात मैं आपके महावत के साथ भागकर अपना जीवन बर्बाद करने वाली थी। लेकिन इस *नर्तकी के दोहे ने मुझे सुमति दी, कि जल्दबाज़ी न कर, हो सकता है तेरा विवाह कल हो जाए, क्यों अपने पिता को कलंकित करने पर तुली है ?"* 
...✍
*युवराज ने कहा -* *महाराज ! आप वृद्ध हो चले हैं, फिर भी मुझे राज नहीं दे रहे थे। मैं आज रात ही आपके सिपाहियों से मिलकर आपको मारने वाला था। लेकिन इस *दोहे ने समझाया कि पगले ! आज नहीं तो कल आखिर राज तो तुम्हें ही मिलना है, क्यों अपने पिता के खून का कलंक अपने सिर पर लेता है! थोड़ा धैर्य रख।"*
...✍
*जब ये सब बातें राजा ने सुनी तो राजा को भी आत्म ज्ञान हो गया ।*

 *राजा के मन में वैराग्य आ गया। राजा ने तुरन्त फैंसला लिया -*

*"क्यों न मैं अभी युवराज का राजतिलक कर दूँ।" फिर क्या था, उसी समय राजा ने युवराज का राजतिलक किया और अपनी पुत्री को कहा - "पुत्री ! दरबार में एक से एक राजकुमार आये हुए हैं। तुम अपनी इच्छा से किसी भी राजकुमार के गले में वरमाला डालकर पति रुप में चुन सकती हो।"*

 *राजकुमारी ने ऐसा ही किया और राजा सब त्याग कर जंगल में गुरु की शरण में चला गया ।*
...✍
*यह सब देखकर नर्तकी ने सोचा -* *"मेरे एक दोहे से इतने लोग सुधर गए, लेकिन मैं क्यूँ नहीं सुधर पायी ?"*

 *उसी समय नर्तकी में भी वैराग्य आ गया । उसने उसी समय निर्णय लिया कि आज से मैं अपना नृत्य बन्द करती हूँ*

*"हे प्रभु ! मेरे पापों से मुझे क्षमा करना। बस, आज से मैं सिर्फ तेरा नाम सुमिरन करुँगी ।"*

*lockdown भी काफ़ी निकल चुका है, बस ! थोड़ा ही बचा है*
 *---- आज हम इस दोहे को कोरोना को लेकर अपनी समीक्षा करके देखे , तो हमने पिछले 22 मार्च से जो संयम बरता, परेशानियां झेली , ऐसा न हो कि अंतिम क्षण में एक छोटी सी भूल, हमारी लापरवाही, हमारे साथ पूरे समाज/गाँव/शहर/राज्य को न ले बैठे।*

*आओ हम सब मिलकर कोरोना से संघर्ष करें।* 

*#घणीगई #थोड़ी रही, #या #में #पल-#पल #जाय।* 
*#एक #पलक #रे #कारणे, #युं #ना #कलंक #लगाय।"*

*घर पर रहें ,सुरक्षित रहें व सावधानियों का विशेष ध्यान रखें।*
       🙏🙏🙏🙏🙏

Friday, October 23, 2020

बाप हा बाप असतो,🤕 मन हेलावून टाकणारा वायरल मॅसेज नक्की वाचा मग बाप समजेल🙏

*⚜️👍🏼बाप हा बापच असतो!*
"पंखे,लाईट बंद न करता बाहेर का निघून जाता?"

"टीव्ही चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही.तो पाहिला बंद करा!" 
"पेन स्टँड वर ठेवा,नाहीतर खाली पडेल!"

मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना अजिबात आवडत नसतात. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे.!.

प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्या फार फरकाने हीच गोष्ट असते.!.

काल जोपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं.!.

पण आज त्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं.
"मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार".!.
वडिलांची बोलणी असह्य झालीत,असं त्याला वाटत होतं.!.

*तो मुलाखतीसाठी निघाला.*

"कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे!
                आणि 
*उत्तर आलं जरी नाही तर ठोकून दे" असं सांगून वडिलांनी.!.*

*आज नेहमीपेक्षा जास्त पैसे दिले वडीलांनी...*

मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचला.

*तिथे प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता,दरवाजा पण उघडाच होता.दरवाज्याचं लॕच व्यवस्थित बसवलं नव्हतं, त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता,त्याने तो दरवाजा आपटायचा बंद केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला.*

*आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता.पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता.याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली.स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं.*
 
"पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं.

'तो हळूच जिना चढू लागला.!.

*काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते.त्याला वडिलांचे शब्द आठवले ! पंखे,लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?; आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला.,त्या विचारातच त्याने दिवे बंद केले.*

वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला.!.

त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती.त्याच्या लक्षात आले की ती चटई     दुमडली होती,कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती,त्याने चिडूनच ती चटई सरळ केली.त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते,तर मागील काही ओळी रिक्त होत्या.
*परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते,त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या.*

अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडतांना दिसत होते,त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. 

*"तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला.!."*

मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, *"तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" त्याला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे,किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला.!.* 

"आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले.

 *"आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही,काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही.म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली.!.*  

*"आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी,स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत.!.*, 

*आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले.!.*

*आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे.आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे,या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला.!.*

त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला.

*आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.!.*

*दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छिन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात.!.* 

आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे,तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात.!.

*आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते  आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं.  ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत.आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो; परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते.!.*

आई जेंव्हा म्हातारी होते,तेव्हां ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते; परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो.म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही.!.
  *जिवंतपणी आईवडीलांचा चिडण्यावर,रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर तत्वांवर मनःपूर्वक शांततेने विचार करा आपले खरचं चुकत आहे का? हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा बघा काय हाती लागतयं ?*
*ll🌹🙏जय जिजाऊ 🙏🌹ll*
*•~~~~~~~~~👆~~~~~~~~~•* आलेला मेसेज सुंदर वाटला म्हणून फॉरवर्ड करीत आहे.

Thursday, October 22, 2020

lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे

lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे याचा मार्गदर्शन करणारा छोटा व्हिडिओ अवश्य पहा v आपला वेळ व दगदग  वाचवा##LIC#AGENT#PAY# आपल्या मित्र मंडळीना सुद्धा पाठवा ,सुरक्षित रहा, तरुण तडफदार पाहत रहा, 

Saturday, October 17, 2020

👏 *शेवटची संधी* . 👏* विदर्भ मराठवाडा पुणे शिक्षक व पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०*

👏 *शेवटची संधी* . 👏
* विदर्भ मराठवाडा पुणे शिक्षक व पदवीधर मतदार नावनोंदणी २०२०*
राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क मिळवण्यासाठी आपली नोंदणी आवश्य करा. आत्ता नोंदणी करणे झाले अगदी सोपे, आपल्या घरुनच करा नोंदणी.

*आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू  शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.*
Link- https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/

*ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.*
Link-https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

*अधिक माहिती व नोंदणी करताना अडचण असेल तर संपर्क: 
🎓 आपला पदवीधर जनजागरण अभियान  तरुण तडफदार रावेर  🎓9403652599

Saturday, September 26, 2020

शेतकरी व्यथा, वायरल कविता,,

मुंग गेले उडीद गेले कपाशी न केली बोम 🙏
काय करू देवा आता सोयाबीनला पण आले कोम 🙏
फाटकं धोतर फाटक खेटर तरी कर्ज काढून पेरलं 🙏
दोन घास भाकरीसाठी लेकराले माग सारल 🙏
लय पाणी झाला 
शासन करतो बोम 🙏
काय करू देवा आता 
सोयाबीन आले कोम 🙏
निसर्ग हा लहरी शासनही 
मोठेच खोटे 🙏
गरीब माझा शेतकरी
 त्याला कोण तारी🙏 
पाण्यामुळे जळून गेलं
 भुईमुगाच थोम 🙏
काय करू देवा आता 
सोयाबीनला आले कोम🙏
#महाराष्ट्रतील महापूर
 मीडिया ला काही दिसेना🙏
#सुशांतसिंग व कंगना 
शिवाय त्यांना काही सुचेना🙏 l

🙏🙏👆 कवि 👍  एक  नाव  माहित  नसले ला  कवि 😭😭😭😭😭😭😭😭🤔✍️
✍️

Friday, September 18, 2020

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
 
 ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरिम अहवाल सादर करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना बॅकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक महिला सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपनी) यांच्याकडून कर्ज घेतात असे निदर्शनास आले आहे. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहात या महिला हळहळू अडकत जातात व त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होता. याबाबत अभ्यास करण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी., रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर या सदस्यपदी आहेत. तर लक्ष्य प्रतिष्ठान (अमरावती)च्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष (राजगुरुनगर, जि. पुणे) विजयाताई शिंदे, लोकप्रतिष्ठान (उस्मानाबाद) च्या सचिव डॉ. स्मिता अभय शहापुरकर, स्वयंसिद्धाच्या (कोल्हापूर) संचालिका श्रीमती कांचन बाळकृष्ण परुळेकर या अशासकीय सदस्य आहेत. तर उमेद अभियानाच्या अतिरिक्त संचालक मानसी बोरकर ह्या या समितीच्या सदस्य सचिव आहेत.

राज्यातील महिलांना सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) या जादा व्याजाने  कर्ज देऊन त्यांना आपल्या चक्रव्युहात अडकवत आहेत. त्यामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचा या अभ्यासगटाचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निर्माण झालेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिला ह्या सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांचे) कर्ज घेऊन त्यांच्या चक्रव्युहात अडकल्या आहेत किंवा कसे याचा सखोल अभ्यास करणे, सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) यांच्याकडून महिलांनी कर्ज घेण्याची कारणे, व्याजाचा दर, कर्ज वितरणाची पध्दती, कर्जाचा वापर, कर्ज वसुली पध्दत, कर्जवसुली वेळेवर न होण्याची कारणे व या सर्व बाबींचा ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची व्याप्ती, राज्यात अभियान कितपत यशस्वी झाले, अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होते किंवा कसे, विपणनाची पध्दत याबाबत अभ्यास करणे तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचविणे यावरही समिती काम करणार आहे.

राज्यस्तरीय अभ्यासगट अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपगट निर्माण करुन ते उपगट विविध जिल्ह्यांना भेटी देतील. राज्यातील महिलांशी चर्चा करुन त्यांच्या आर्थिक समस्या जाणून घेतील. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे अध्यक्ष व महासंचालक यांच्यासोबत चर्चा करुन त्याच्याकडील स्वयंसहाय्यता गटाची कार्यपध्दती, त्यांचे उत्पादने आणि त्यांचे विपणन याबाबत महिती घेतील. सदर अभ्यासगट हा फक्त महिलांच्या आर्थिक अडचणी, त्यावर उपाययोजना यासाठी असून मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Friday, September 11, 2020

इन्शुरन्स पॉलिसी# बिमा पर का GST जीएसटी हठणा* चाहिए प्रशांत बोरकर जी की मांग

*अपने ओर अपने परिवार के भविष्य ओर स्वास्थ  के लिये सरकार की योजना का लाभ ना लेकरं बलकी मेडिकल पॉलिसी खरी द कर किंमत देनेवाले को कैसा टॅक्स ,,लगान एनसनियत के खिलाफ हे

👍इन्शुरन्स पॉलिसी बिमा पर का gst हठणा* चाहिए   करोडो लोगोको राहत देणे समाजसेवी श्री प्रशांत बोरकर जी की अपील       👌👌                   
 

,Gst एक जुलाई १७se बीमा महगा हो  गया ,१८ % टक,,,,,पर कोई भी इसपर ध्यान नहीं दे रहा है,,,बीमा ये नुकसान भरपाई का तत्व है। उसपर क टैक्स नही gcलेना चाहिए,,,टैक्स सेविंग्स से ही जादातर लोग बीमा लेते है,, अपने निजी सांसद विदायक नेता को मिल के निवेदन दे और बीमा पर का पूरा टैक्स हटाने की मांग करे,,,, बीमा ग्राहक भी अपने तरीके से  इसका विरोध करे,,,,कौकि बीमा जो चीज है जो कंपनिया सरकार का काम कर रही है,, एक प्रकार सहारा दे रही है,,,जड़ तर privete बीमा कंपनियां loss मैं है वो तो बोनस भी नही दे सकती,,,और lic तो पुरा पैस्सा govt सरकार को दे देती है,,,इसलिए इसमे सरकार का काम सुलभ कर रहि है,,देश मैं कोई बड़ा संकट आया तो उसकी भरपाई बीमा कंपनी ही करती है,सरकार की जिम्मेदारी बीमा कपनी उठाती ही,,,,उल्टा बीमा कंपनी  ग्राहक को ज्यादा से ज्यादा करसवलत दे कर उन्हें स्वावलंबी कर सकती है सरकार,,कोई भी बीमा पर टैक्स लेना नैतिकता की दृष्टि से बराबर नही है,,,जी जो अपनी मरने के बाद का कफन और बेसहआरा बीबी बचो का बदोबस्त करता है उन्हें टैक्स जे बोझ तले दबाना कैसे जा यस है,,,,में तबीमा परओरो सेवा कर से विरूद्ध लेख लिख रहहु पर को ही  साथ नही द्व रहा,,,देखे,, मानवता के प्रतीक बीमा को कर के च्रक वुह से कोंन बचाता है,,bimaपर कर टैक्स लेना बीमारी संकट को आमंत्रण देना है,,लोगोका जीने का, सुरक्षिततेसाठी का अधिकार पर आक्रमण है,🙏🏼🙏🏼👉🏻🤞🏼 *,प्रशान्त बोरकर* मुक्त पत्रकार,ग्राहक हक्क मानवी हक्क संविधान अभ्यासक,, सेवानिृत्त एजन्सी मॅनेजर बिर्ला sanlife , रावेर🙏🙏 9403652599

21जून 2018 फेसबुक पोस्ट, सर्व्हिस टॅक्स के बारेमे 2013 से पोस्ट ,GST हटाव की सबसे पहले करणे वाले आर्थिक सलाहकार श्री प्रशात बोरकर जी बिमा के क्षेत्र मे कई  समस्या पर आवाज उठाकर बिमा ग्राहक ओर विमा अजेंत को न्याय दिलवा दिया हे,,,

कान,नाक,घसा संबधी काही आजार आहे का..? ....तर मग उशीर करू नका आजच डॉ उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करून घ्या.अधिक माहितीसाठी संपर्क :-9422583795


महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातूनपालकमंत्री तसेच अनेक नेत्यांना निवेदन सादर करून चर्चा

सावदा ,महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातून मागील आठवड्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे घेण्यात आलेल्या मिटींगला जो ठराव झाला होता त्या अनुषंगाने आज रावेर,   यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी श्री बबन बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांना आज निवेदन सादर केले त्यांनी निवेदन स्वीकारले व आवर्जुन सांगितले की मी तुमचा हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती उपाययोजना केल्या शिवाय राहणार नाही. त्यावेळी रावेर मुक्ताईनगर व यावल तालुक्यातील उपविभागीय उपाध्यक्ष श्री राजू बोरसे तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मास्टर शेख रफी , रावेर तालुका अध्यक्ष श्री नीरज सोनवणे , आतिष केदारे व किशोर लोखंडे यांची सुद्धा उपस्थिती होती. 
नंतर पाळधी येथिल भेट घेतल्यानंतर जळगाव ला आले असताना मा. उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली तसेच मा श्री गिरीश महाजन , श्री उमेशदादा पाटील , श्रीमती रक्षाताई खडसे यांनाही निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून सुध्दा आपल्या कामाची दखल घेतली जाणार आहे असे सर्वांनी मिळून आश्वासन दिले आहे. व ते आपल्या कार्याचा पाठपुरावा करून दुर्गादेवी उत्सवाच्या वेळे पर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल अशी आम्ही योजना करणार आहे असे श्री गिरीश महाजन यांनी सांगितले

Monday, September 7, 2020

महसूल रचनेत लोकाभिमुख बदल करताना सातबाराही नवीन स्वरूपात देण्याचा निर्णय

सातबारात आता युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो, क्यूआर कोड
सातबा-यातील बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल
                    - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
 
        महसूल रचनेत लोकाभिमुख बदल करताना सातबाराही नवीन स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सातबा-यात बारा प्रकारचे बदल होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

        महसूल नोंदीमध्ये अधिक पारदर्शकता, स्पष्टता व अचूकता आणण्यासाठी व नागरिकांचे हित जोपासले जावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाकडून यापूर्वीच ऑनलाईन सातबा-याची प्रक्रियाही जोरदारपणे राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातही सातबा-याचे जवळजवळ 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑनलाईन सातबारा सुविधा प्रक्रियेतील अभिलेखिकरण, डिजीटल स्वाक्षरी आदी तांत्रिक बाजू आदी काम पूर्ण झाले असून, जलदगतीने व सुलभरीत्या अचूक नोंदीसह डिजीटल स्वाक्षरीसह सातबारा मिळण्यास मदत होत आहे. आता राज्यात जवळजवळ आठ दशकानंतर नवी महसूल रचना अंमलात आणण्याचा शासनाचा निर्णय आहे.

         त्यानुसार आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड असणार आहे. अनेक उता-यांमध्ये क्षेत्र न जुळण्यासारख्या अडचणी असतात. त्या यामुळे दूर होणार आहेत. लागवडीसाठी योग्य व पोटखराबा क्षेत्राचा उल्लेखही त्यात असणार आहे. त्यामुळे महसूलविषयक वादांचे प्रमाणही कमी होईल व पारदर्शकता वाढेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

          महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, ब्रिटीश सरकारच्या काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. हा बदल 1941 मध्ये झाला होता. त्यानंतर आता जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. 

        यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गाव नमुना नंबर 7‍ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील.सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असेही श्रीमती कनिचे यांनी सांगितले.

00000

सावदा मध्ये स्वस्त ओषधी चे दुकान घनश्याम जी महाराज व अनिलभाऊ चोधरी यांचे हस्ते शुभारंभ

सावदा ता रावेर मध्ये स्वस्त औषधी चे दुकानाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी फैजपूर येथील घरी जनार्दन महाराज व अनिल भाऊ चौधरी भुसावळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व दिपप्रज्वलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी म्हणून या नगरीच्या अनिताताई पंकज येवले नगराध्यक्ष सावदा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक लोखंडे प्रगतिशील शेतकरी व सन्माननीय कार्यकर्ते डॉक्टर उपस्थित होते 

भाजप चे धडाडीचे कार्यकर्ते श्री नितिन पाटील यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड

रावेर चे भाजप कार्यकते श्री नितिन पाटील यांची निवड भाजप रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी करण्यात आली असून त्यांना त्या निवडीचे पत्र भाजप चे जेष्ठ नेते सुरेश धनके यांचे हस्ते देण्यात आले
 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन तालुका अध्यक्ष लासुरकर, सरचिटणीस सी एस पाटील ,प्रविण पाचपोहे, कैलाश पारधी शहाणे  आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नितीन पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन केले
 तरुण तडफदार तर्फे ही त्यांचे अभिनंदन, 
त्याचे निवडीबद्दल  पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला,,

Wednesday, September 2, 2020

आज पासून राज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करण्यास सुरुवात

रावेर। 2/9/2020=
आज पासून रावेर रेल्वे स्टेशन हुन  राज्य अंतर्गत प्रवासासाठी आरक्षण सुरू झाले आहे, 
त्यात पसेंजर बंद आहेत तसेच पठाणकोट काशी एक्सप्रेसपण बंद आहे
सकाळी आठ ते चार वाजेच्या  दरम्यान आरक्षण करू शकतात == जनरल तिकीट  बंद  आहे  तरी प्रवसि यांनी आरक्षण करून नियोजन करावे 
माहिती  रेल्वे अधिकारी याचे कडून मिळाली
🙏🙏
रावेर रेल्वे प्रवाशी मित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश पाटील यांना मातृशोक

गं.भा. वनरसीबाई आनंदा पाटील  केऱ्हाळे बु,  वय 89 यांचे दि. 31/08/2020 सोमवार रोजी 12वाजता वृद्ध काळाने निधन झाले. केऱ्हाळे बु, ता. रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या  त्या मातोश्री होत्या.
🙏🙏🙏
तरुण तडफदार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Tuesday, September 1, 2020

नाथाभाऊ ना वाढदिवसाच्या शुभेच्छा,🙏🙏 सावदा फेजपुर मध्ये विविध कार्यक्रम आयोजित👍नन्दाबाई लोखंडे नगरसेविका

सावदा, माजी महसूलमंत्री माजी विरोधी पक्षनेते श्री एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐
सावदा भाजप तर्फे आज बिविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्यात फेजपुर येथील कोविड सेंटर मध्ये आज सकाळी नऊ वाजता फळवाटप चा कार्यक्रम नगरसेविका नंदाबाई लोखंडे,सावदा शहराचे अध्यक्ष पराग पाटील भारतीय जनता पार्टी  गजु भाऊ लोखंडे जितेंद्र भारंबे संजू भाऊ चौधरी राहुल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे  पदाधिकारी पंकज भाऊ येवले सय्यद अजगर विकी भंगाळे आदी असंख्य
 भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे

*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

💥💥एक पत्रकार हरवला,✍️
*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

*'दैनिक सामना'चे हिंगोली येथील जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते 41वर्षांचे होते. योगेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने पाटील परिवार आणि सामना परिवारावर शोककळा पसरली आहे.*

*योगेश पाटील यांना संभाजीनगर येथील नंदलाल धूत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांच्यासह त्यांची टीम योगेश पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होती. मात्र पाटील यांची गेली 24 तास सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली. योगेश पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी संभाजीनगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले*

*त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा लहान मुलगा, आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आधी धर्माबाद जिल्हा नांदेड येथील तालुका प्रतिनिधी, नंतर सामना च्या नांदेड कार्यालयात शहर प्रतिनिधी, पुढे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे जिल्हा प्रतिनिधी आणि पुन्हा मराठवाड्यात हिंगोली येथे जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगेश पाटील यांनी काम केले. अत्यंत सचोटीचे, स्पष्टवक्ते आणि धडाकेबाज पत्रकार असलेल्या योगेश पाटील यांचा नांदेड, जळगाव आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत दांडगा जनसंपर्क होता.*

 त्यांना तरुण तडफदार पत्रकार ग्रुपमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

Saturday, August 29, 2020

*भा.ज.पा.चे राज्यव्यापी घंटानाद* आंदोलन


आज दि.29/08/20 शनिवार भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे घंटानाद आंदोलने
केंद्र सरकारकडून देवस्थाने भक्तांसाठी खुले करण्यासाठी परिपत्रक या पुर्वीच काढले आहे व त्या नुसार देश भरातील देवस्थाने खुली करण्यात आली आहे.
परंतु राज्यातील आघाडी सरकारने त्यावर कुठल्याही  कार्यवाही केलेनाही व भक्तांसाठी मंदिरे खुले केली नाही
त्यासाठी कुंभकर्णपेक्षा गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार इशारा देण्यासाठी राज्यभर दार उघडा उध्ववा दार उघड अशी हाक देवून घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच रावेर येथे भाजपा तर्फे आंदोलन केले व धुळे येथे अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना फि माफीचे निवेदन देतांना पालक मंत्र्या समोर पोलिसांनी विद्यार्थीनवर केलेल्या अमानुष लाठी हल्यांचा निषेध सुध्दा करण्यात आला. यासंबंधी मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. या प्रसंगी भाजपा ता.अध्यक्ष राजन लासुरकर ,जि.उपाध्यक्ष पद्माकर महाजन,प.स.सभापती जितेंद्र पाटील, कु.उ.बा.समिती सभापती श्रीकांत महाजन, ता.सरचिटणीस सी.एस.पाटील सर,प.स.उपभापती.जुम्मा तडवी,गटनेते प.स.पि.के.महाजन,जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, यु.मो.ता.अध्यक्ष महेंद्र पाटील,ता.सरचिटणीस यु.मो.खेमचंद्र धांडे,प.स.सदस्य हरलाल कोळी, संदिप सावळे, रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष मनोज श्रावक,सरपंच सिंगत प्रमोद पाटील,दुर्गादास पाटील,नगिनदास चौधरी,वसंत महाजन,माधव चौधरी, पंकज चौधरी, व कार्यकर्ते उपस्थित होते

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

देश   स्वतंत्र झाला  अनेक वर्षे झालीत आपण सर्व भारतीय  मिळून मिसळून आपल्या देशाच्या  साठी चांगले काम करत आहोत आणखी करू या, लोकशाही अहिंसा समाजवादमार्ग जो जगाला  संदेश देत आहोत तो मार्गाने आपण  सर्व समाजाचे कल्याण करू या,
, आपले मतभेद विसरून आपल्या देशाची आर्थिक प्रगती होईल आणि आपल्या देशाची संपत्ती सुरक्षित राहील या साठी  तळागाळातील जनतेला पण लाभ होईल असा विचार करून सत्तेचे विक्रेदिकरण करून सामान्य माणूस पण आमदार खासदार झाला पाहिजे अधिकारी झाला पाहिजे , सेवा गोरगरिबांना मिळाली पाहिजे त्यासाठी सार्वजनिक  सरकारीयंत्रणा सुरक्षित राहिली पाहिजे, ज्यांनी आज गायत या देशाला सशक्त बनविण्यासाठी राब राब राबले ते आपले पूर्वज  सेनिक सामान्य माणुस करदाते तसेच अनमोल प्राणपणाने लढले ते सर्व लाखो  स्वातंत्र्य चळवळीत ज्या हुतात्म्यांचे आठवण🙏🙏🙏 नमन करून त्याचे उपकार न विसरता त्याचे स्मरण करावे मनातुन मनापासून  आभार 👏👏 सलाम,🙏
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व भारतीय  जनतेस हार्दिक शुभेच्छा,
🙏🙏🙏🌈🌈
प्रशांत बोरकर
तरुण तडफदार टीम✍️✍️🙏🌈🌈🎯

Wednesday, August 12, 2020

बजाज फायनान्स लिमिटेड शाखा रावेर कडून रावेर पोलीस स्टेशन यांना सैनिटाइजर ,मास्क, आणि ग्लोब्स देण्यात आले

आज रोजी बजाज फायनान्स लिमिटेड शाखा रावेर कडून रावेर पोलीस स्टेशन यांना सैनिटाइजर ,मास्क, आणि ग्लोब्स देण्यात आले। देताना शाखा व्यवस्थापक मयूर कुर्मी, सोने तारण कर्ज विभागाचे व्यवस्थापक बाबा साळुंके व वैयक्तिक कर्ज विभागाचे व्यवस्थापक किरण पाटिल तसेच शिपाई किरण महाजन उपस्थित होते।

Saturday, August 8, 2020

डॉ सुनील सुकलाल देवरे यांची सावता सेनाच्या जळगाव जिल्ह्याध्क्षपदी निवड

मुक्ताईनगर येथील राजकीय सामजिक कार्यकर्ते श्री सुनील सुकलाल देवरे यांची सावता सेनाच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे
त्यांचे निवडीसाठी श्री मुंजाजी गोरे यांनी निवडीचे पत्र दिले आहे माळी समाजाचं हितासाठी व  संघटना चे ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे 
त्याचे निवडीबद्दल ओबीसीं आदिवासी विकास मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर, सुनील पवार, आदी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,

Friday, August 7, 2020

ओबीसी आरक्षणाची पुर्ण अंमलबजावणी करणे संदर्भात.रावेर वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार याना निवेदन



रावेर दि. ७ (प्रतिनिंधी) येथे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आदोलनाच्या रावेर तालुक्याच्या  वतीने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना निवेदन सादर करण्यात येते की  देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल आयोग कमीशन नुसार दिलेल्या २७ टक्के आरक्षणाची उघड पणे पायमल्ली सुरु आहे. त्या विरोधात आणी ओबीसींच घटनादत्त आरक्षणा वाचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पहिल्या  टप्यात राज्यभर निवेदन देवुन सरकारला जागे करण्याची मोहीम सुरु केली आहे. 

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,ओबीसींमध्ये सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतीशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याच कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णियाचा सास्कृतीक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या  दुराव वेवस्थेला कारणभुत असल्याची जाणीव प्रथमताच मडल आयोगामुळे झाली. १९७८ सालच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरच्या महीन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोरारिी देसाई सरकारने भारतातील सामाजिक आणी आर्थिक स्तरावर मागास राहीलेल्या जाती आणी जमातींचे अध्ययन आणी त्यांचे वर्गिकृत विश्लेषण करण्यासाठी एक सहा सदस्यीय आयोग नेमला. प्रस्तुत आयोगाच्या नेतृत्वाची धुरा ही तात्कालीन समाजवादी विचारवंत आणी खासदार बिंदेश्वरी प्रसाद मडल याच्या खाद्यावर सोपवण्यात आली. पुढे हाच आयोग आणी  शिपारशी आनी ‘मडल कमीशन’ आणी ‘मडल रीपोट’ म्हणुन कायम चर्चेत राहीले. मागासवगीयाच्या (ओबीसीच्या) हितरक्षनार्था असलेल्या आयोगाने १९८० मध्ये आपला अहवाल सादर केला होता. डि.पी.मडल याच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या आयोगाने इतर मागास समाजाची यादी तयार करण्यासाठी सामाजिक, शिक्षण व आर्थिक या प्रश्नावर ११ मुद्याची बिंदुवली तयार केली होती.

आयोगाने हिंदु दर्मियांबरोबरच इतर धर्मातील मागास, की ज्याचा परपरागत व्यवसाय हा हिंदु धर्मा सारखाच आहे अशाचाही विचार केला. हा आधार घेवुन आयोगाने ३७४३ जातीना मागास गटात प्रविष्ठ केले. अशा जातीची सख्या एकुण लोकसंखेच्या ५२ टक्के होती. कालेलकर आयोगाने प्रस्तुत केलेले प्रमाण ३२ टक्के तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्णाने दिलेल प्रमाण ४० टक्के होते. मडल आयोगाला ब्राम्हनवाद्यानी व त्यांच्या सर्थाकानी मुद्दामच वादग्रस्त बनतवले होत. व्ही.पी. सिंग सरकारने १९९० मध्ये मडल आयोग लागु करण्याची घोषणा केली. यात ओबीसीना २७ टक्के आरक्षणाची तरतुद होती. हे प्रमाण सवोच्च न्यायालयान १९६३ मध्ये बालाजि केस संधर्भात, आरक्षणाचे एकुण प्रमाण हे ५० टक्के पेक्षा जास्त असता कामा नये या निवाडयाच्या मर्यादेला अनसरून होते. परंतु देशात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना २७ टक्क आरक्षण हे तटपुंजे होते.    

आशा प्रकारेचे निवेदन वंचित बहुजन आघाडि, महिला आघाडि, युवक आघाडि, व शहर आघाडि असे निवेदन मा.निवासी नायब तहसिलदार मा. संजय तायडे यांना दिलेल्या निवेदनावर

      वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, वंचित बहुजन आघाडीचे महिला रावेर तालुका अध्यक्षा सौ. उषा सुरदास,राहुल घेटे, राजेंद्र अवसरमल,रितिक रजाने, प्रतिक दामोदरे, सचिन रजाने,छोटू अढांगळे,सलीम शाह ,सुरेश अटकाळे,वि8नोद तायडे,ज्योती शिरतुरे,इंदुबाई तायडे,कुसुम गाढे,शोभा शिरतुरे,आशा संन्यास यांच्या सहया आहे.@@##########👌👌👌👌👌👌👌👍🙏👌👌👌🙏 ओबीसी बांधावा साठी आपण मागणी केली त्याबद्दल आपले वंचीत बहुजन आघाडी चे धन्यवाद,, ओबीसी ना बरोबर घेऊन एक नवी शक्ती निर्माण करू या,,,अब जो देश हित की , ओबीसी हित की बात करेंगा, वो ही देश पर राज करेंगा,,,🎯🙊🙏प्रशांत बोरकर ओबीसी अदिवासी विकास मोर्चा,9403652599

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...