Wednesday, April 13, 2022

*बैसाखी निमित्त नवजीवनाचा संदेश**- संत राजिन्दर सिंह जी महाराज


वैशाख महिन्यात प्रकृतीच्या नियमानुसार झाडा-झुडपांना नवीन पालवी फुटू लागते. त्याच्यातूनच एका नवीन जीवनाची सुरुवात होते, तर आपण ही यावरून एक नवीन बोध घेतला पाहिजे कि आपल्या जीवनात नवीन विचारांचा अंकुर फुटावा आणि आपल्या जीवनाची नवीन सुरुवात व्हावी. आपल्या मनातील सर्व भेदभाव नष्ट व्हावेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये बैसाखी म्हणजे वैशाख मास साजरा करण्यात येतो.
सन 1699 वैशाखीच्या दिवशी शिखांचे दशम गुरु 'गुरु गोविंद सिंह जी महाराज' यांनी खालसा पंथाची स्थापना केली. या दिवशी दशम गुरू साहेबांनी पाच प्रिय लोकांची निवड केली. बौद्ध लोकांना सुद्धा बैसाखी पवित्र मानला जातो. बैसाखी (वैशाखी) च्या दिवशी महात्मा गौतम बुद्धांचा सुद्धा जन्म झाला. बैसाखी च्या दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.
महापुरुष जेव्हा-जेव्हा या दुनियेत येतात तेव्हा एकच संदेश वारंवार जगाला देतात. तो संदेश काय आहे? नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त होतो, त्याच्यातूनच आपण आपल्या निजधामास परत जाऊ शकतो. परमात्मा महाचैतन्याचा महासागर आहे आणि आपला आत्मा त्याचा एक अंश आहे. परमात्मा प्रेम आहे आणि आत्मा सुद्धा त्याचा अंश असल्याकारणाने प्रेमच आहे. याच्यातच सहजपणे प्रभु मिलनाची आस आहे आणि याचा विशेष गुण म्हणजे आपल्या प्रियतमा बरोबर एकरूप होणे असा आहे.
बैसाख धीरन क्यों वाडिया जिना प्रेम बिछोह'
बैसाख धरीन क्यों...... वैशाख मास आलेला आहे, ज्या प्रमाणे धान्य पिकल्यानंतर त्याची कापणी होते, त्याच प्रमाणे कर्मफळाच्या सिद्धांतानुसार नरदेह प्राप्त झालेला असून सुद्धा हा जीव भगवंतापासून विन्मुख झाला. त्याला त्याचा विसर पडला. तरी ही त्या प्रभूलाच विसरून प्रभू विना निष्क्रिय पणे तुम्ही जीवन कसे जगू शकता ? त्याला कसे विसरलात?
हर साजन पुरुख विसार के लगी माया धोह 
आपण परमात्म्यापासून दूर झालेले आहोत, त्याला विसरलेले आहोत आणि मोह-माया आपल्या पाठी हात धुऊन लागलेली आहे. माया म्हणजेच अज्ञान. या अज्ञानाची सुरुवात कुठून झाली? ही एक दुःखदायक गोष्ट आहे. पिक बाहेर कापून पडलेलं आहे. महापुरुष हे पाहून म्हणतात, तुम्ही प्रभू पासून विभक्त झालेले आहात, तुम्ही त्याचे अंश आहात, तुम्ही त्या जगन्नाथाला विसरलात आणि हे सर्व विनाशाचे मूळ कारण आहे. भगवंताला विसरून आपण आपला जन्म व्यर्थ घालवत आहोत. "प्रभू बिना अवर न कोय"  प्रभू शिवाय तुमच्या आत्म्याचा कोणी साथी नाही. मुलं, पत्नी ही सर्व प्रारब्ध कर्मानुसार प्रभूंनी आपल्याशी जोडलेली आहेत. हे समजून आपली देणी-घेणी प्रेमपूर्वक निभवावीत आणि आपल्या स्वगृही जावे. तो परमात्मा जो आपल्या आत्म्याच्या संगतीत आहे, त्याचा साथी आहे, तोच तुमच्याबरोबर राहील. आपल्याला हा नरदेह प्रभु प्राप्तीकरिता मिळालेला आहे हे लक्षात ठेवावे.
आत्मा चेतन स्वरूप आहे. जोपर्यंत त्या महाचेतन प्रभूशी त्याचे मीलन होत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नाही. जो पर्यंत परिपूर्ण परमात्म्याच्या नामाशी तो एकरुप होत नाही तो पर्यंत या मनावर नियंत्रण पण करता येणार नाही. "नाम मिलिये  मन तृप्तीये". भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की, त्यांनी एकदा यमुना नदीत उडी मारली, त्या डोहात हजार मुखी कालिया नाग होता, त्यांनी बासरी वाजवून हजार मुखी कालिया नागाचे मर्दन केले. हा सर्प कुठला होता बरे? मन! ज्याचे आपल्याला डंक मारण्याचे हजारो प्रकार आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. "मन जीते जग जिते" ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. आपल्यात आणि प्रभु मध्ये मन हाच एक अडथळा आहे.
जर तुम्ही परमेश्वर प्राप्तीचा निश्चय केला असेल तर एक पाऊल मनावर ठेवा अर्थात त्याला स्थिर करा, आणि आणि दुसरे पाऊल जे तुम्ही उचलाल ते थेट प्रभूच्या ईश्वरीय साम्राज्यात पडेल.
हा वैशाख मास तेव्हाच फलदायी होईल जेव्हा, नवीन जीवनाचा आरंभ होईल. तेव्हाच यश प्राप्त होईल. ज्यांनी त्या परमात्म्या ला प्राप्त केले आहे, त्यांच्या संगतीत राहा. जर कोणी संत भेटले तर आपला उद्देश सफल होईल. ज्यांना पूर्ण संत-सद्गुरू भेटले ते भगवंताच्या दरबारात शोभा प्राप्त करतील. आणि तुमच्या जीवनात प्रेम आणि भक्तीभाव जागृत होईल आणि या बाह्य जगताच्या मायेच्या विषाचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. तुम्ही सुख-शांती च्या महासागराला जाऊन मिळाल व तुम्ही या भवसागरातून तरुन जाल. तोच महिना, तोच दिवस, तोच मुहूर्त चांगला ठरेल ज्यात आपण प्रभूला प्राप्त करू. ज्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी होते त्यांच्यावर संतां कृपा होते व त्याचे जीवन सफल होते.

Tuesday, April 5, 2022

*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*

*प्रेस विज्ञप्ति*
*-  संत राजिन्दर सिंह जी महाराज*
*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*
2 एप्रिल रोजी हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांच्या 74 व्या वार्षिक भंडारा सत्संग प्रसंगी सावन कृपाल रुहानि मिशनचे अध्यक्ष परम संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी युट्युब वर शिकागो, अमेरिका येथून जिवंत प्रसारणा द्वारे आपला पावन संदेश समस्त मानव जाती करिता दिला.

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी या विशेष प्रसंगी आपल्या संदेशात म्हटले की हुजुर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी आपल्या कृपेने आणि दिव्य प्रेमाने लाखो लोकांचे जीवन चैतन्याने भरले. त्यांनी या अंधकारमय दुनियेत प्रभूच्या ज्योती चा प्रसार केला. यामुळे लोकांचे लक्ष अध्यात्माकडे गेले आणि ते लोक या मार्गावर अग्रेसर झाले. त्यांनी त्या सर्व लोकांना प्रभूची ज्योती आणि प्रेम यांची अनुभूती प्रदान केली. 

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी मागील शतकातील महान संतांनी दर्शविलेल्या अध्यात्मिक मार्ग समजाविताना म्हटले की त्यांनी दिलेलं प्रेम आणि एकतेचा संदेश कुण्या आस्था व धर्माशी संबंधित नसून तो संपूर्ण विश्वासाठी होता. ज्या लोकांनी त्यांची शिकवण जीवनात उतरविली केवळ तेच लोक मनुष्य जीवनाचा वास्तविक उद्देश समजू शकले आणि ते सर्व जीवनाच्या अंतिम ध्येया पर्यंत म्हणजे पिता-परमेश्वरा पर्यंत पोहोचले. त्यांची अशी इच्छा होती की आपण आपल्या जीवनाचे ध्येय 'स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करणे' हे समजून घ्यावे व ते पूर्ण करण्यासाठी आपली पावलं उचलावीत.

हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांचा जन्म 27 जुलै 1858 रोजी ग्राम महिमासिंहवाला, लुधियाना जिल्ह्यात पंजाब प्रांतात झाला. ते आपल्या सत्संगाद्वारे समजावून सांगत की आपण पिता-परमेश्वराची संतान या नात्याने आपल्यातील प्रत्येक जण त्यांना प्राप्त करू शकतो जो आपल्या जीवनाचा प्रमुख उद्देश आहे.

त्यांनी मानवजातीच्या कल्याणार्थ अध्यात्मिक जागृती ची भविष्यवाणी केली होती की पाश्चिमात्य देशात या अध्यात्माचा प्रसार जलद गतीने होईल. त्यांच्या पश्चात संत कृपाल सिंह जी महाराज आणि संत दर्शन सिंह जी महाराज यांनी विश्वभरात अनेक यात्रा करून या अध्यात्मिकतेचे ज्ञान व तंत्र लोकांपर्यंत पोहोचविले आणि सध्या सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष वर्तमान सद्गुरु परम संत राजिन्दर सिंह जी महाराज आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत.

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज जी संपूर्ण विश्वामध्ये ध्यान-अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. याकरिता त्यांना विविध देशांनी अनेक शांती पुरस्कार व सन्माना बरोबर 5 डॉक्टरेट पदव्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
सावन कृपाल रुहानि मिशन ची संपूर्ण विश्वात 3200 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित झालेली आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्वातील 55 हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित केले गेले आहे. त्यांचे मुख्यालय विजयनगर दिल्लीत येथे असून आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरवीले, अमेरिकेत आहे.


सावन कृपाल रुहानि मिशन
मीडिया प्रभारी 
सौरव नारुला

Friday, April 1, 2022

भुसावळ कटनी रेल्वे गाडीचे रावेर येथे स्वागत.जळगाव नंदुरबार पुणे मुंबई अमरावतीसाठी नवीन मेमु ट्रेन सुरू करण्याची प्रशांत बोरकर यांची. मागणी..



रावेर    अनेक वर्षे पासून बंद असलेली  भुसावळ कटणी  रेल्वे गाड्या सुरू झाल्या बद्दल  रावेर रेल्वे प्रवासी मित्र नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले असून जळगाव साठी सकाळी सात वाजता रेल्वे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जनरल तिकीट सुरू नसल्याने आणि  प्सेंजर गाड्या सुरू नसल्याने विद्यार्थी आणि कामगार मजुर व्यापारी दुकानदार यांची मोठ्या प्रमाणावर  गेरसोय होत आहे.
काही महिन्यांपासून भुसावळ इतारशी मेमु ट्रेन सुरू झाली  परंतु  योग्य वेळ नसल्याने प्रवाशी यांना रेल्वे सेवाचा लाभ घेता येत नाही.म्हणून सकाळी जळगाव साठी खंडवा रावेर हून  जळगाव अमळनेर नंदुरबार  अशी मेमु पेसेजर ट्रेन तसेच मुंबई पुणे अमरावती साठी विशेष गाड्या सुरू करावी अशी अपेक्षा  रेल्वे प्रवाशी मित्र श्री प्रशांत बोरकर रशीद तडवी रामकृष्ण चौधरी सुभाष अकोले यांनी व्यक्त केली आहे

Wednesday, March 30, 2022

आईपीओ ने licग्राहकांना आपुलकी आदर युक्त सेवा,🤏 कमी वेळेत , त्त्त्पर सेवा मिळणार 👍🤏👌पारदर्शीव्यवहार कॉर्पोरट मद्ये नोकरशाहीची कार्य शमता वाढणार.

ग्राहक जागृती अभियान क्रमांक 4
👌👉आईपीओ चा  lic  ला आणि जनतेला फायदा  फायदा च  होणार,✍️ग्राहकांना आपुलकी आदर युक्त  सेवा,🤏 कमी वेळेत ,  त्त्त्पर सेवा मिळणार 👍🤏👌पारदर्शीव्यवहार  कॉर्पोरट मद्ये
नोकरशाहीची कार्य शमता वाढणार💫✍️💫
,,सध्या सरकार मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या नवरत्न कंपन्या विक्रीस काढलेल्या पाहतो आहे यातील च्या कंपन्या विक्रीस काढलेल्या होत्या त्यापैकी एलआयसी ही संस्था पूर्वी अडीशे तीनशे कंपन्या बंद पडल्यानंतर तयार करण्यात आलेली होती अशा कंपन्या चा जुना इतिहास आपल्याला माहित असल्यावर सुद्धा आर्थिक क्षेत्रात जनतेला सुरक्षा या दृष्टीने जनतेला सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करणे जनतेच्या संपत्तीचे संरक्षण करणे जनतेच्या हिताचे रक्षण करणे ह्या ग्रहणातून व नुकसान भरपाई तत्व हे महत्वाचे धोरण म्हणून बंद पडलेल्या कंपन्यांमधून एलआयसी ची स्थापना झाली होती ह्या एलआयसीला तत्कालीन सरकारने फक्त पाच कोटी भांडवल दिले होते आज ह्या एलआयसीच्या पाच कोटीचा बदल्यात 500000 कोटीपेक्षा जास्त रक्कम केंद्र सरकारला दिलेली आहे याच बरोबर केंद्र सरकारच्या विविध पंचवार्षिक योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे केंद्र सरकार सांगेल तेव्हा संकट काढायच्या वेळी एलआयसी राष्ट्राच्या मदतीला धावून आलेली आहे एलआयसी चा उत्पन्नाचा भाग दरवर्षी पाच टक्के हा नियमितपणे केंद्र सरकारला दिला जातो व उर्वरित 95 टक्के हा भाग एलआयसीचे पॉलिसीधारक यांना वाटण्यात येतो त्याला बोनस असे संबोधण्यात येते एलआयसी एक विश्वस्त संस्था सून जगातील मोठे मोठे विक्रम मोडीत काढले आहेत एलआयसी ही समाजवादाचा आदर्श आधारस्तंभ देशाच्या राष्ट्र निर्मितीमध्ये फार मोठा सहभाग आहे एलआयसी चा आयपी ओ शेअर बाजारात आल्यास इतर कंपन्या विमा कंपन्यांना सुद्धा मोठी घरात पसरलेली आहे त्यांच्या शेअर चे भाव कमी झालेले आहेत एलआयसी ही शेअर मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी संस्था आहे एलआयसी ने विविध बँकांमध्ये आयडीबीआय बँक ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक अशा विविध बँकांमध्ये आपले गुंतवणूक केली आहे उत्पन्नाचा मुख्य म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सवलत व बचती द्वारे होणारे सरकार दरवर्षी 80D 80सी इन्कम टॅक्स डिटेक्शन मध्ये दोलत देवून सवलत घेते त्यामध्ये लाखो सरकारी व खाजगी कर्मचारी दीड लाख रुपयाच्या सूट साठी आपली गुंतवणूक एलआयसी व खाजगी संस्थांमध्ये हाऊसिंग प्रोजेक्ट मध्ये करते बरोबर सरकारला जीएसटी सुद्धा मिळत असतो टर्म इन्शुरन्स मेडि क्लेम वाहन विमा प्लान मध्ये सुमारे 18 टक्के  जीवन बिमा मध्ये दीड टक्के ते पाच टक्केGST लोक दरवर्षी भारत सरकारच्या तिजोरित देत असतात एलआयसी चां संपूर्ण पेशा हा  भारत सरकार ला मिळत असतो त्यामुळे अश्या या बजेट मुळे सरकार स्वतः चेा पायावर धोंडा मारून घेत आहे आता बजेट मधे दुसरे बदल करणे शक्य नाही कारण कोणी विरोध करायला तयार नाही ताकदवर विरोधी पक्ष नाही आणि जे आहेत त्यांनी च हे धोरण सुरू केले आहे त्यामुळे ते पण नाटक पाहत जनतेची सुटका करण्यात आता जनतेला च आंधळं न रहाता जागरूक पणें सनदशीर मार्गाने लढा सुरू करावा लागणार आहे
तसे  पाहिले  तर  आईपीओ  हा  lic  च्या  फायदा  चा  राहणार  आहे , उद्या  सरकार  lic  ला  सांगून   केव्हाही  पैसे  मागु  शकत  नाही  lic  पण  आणखी  पारदर्शिता  होवून  कार्यशमाता  वाढ  होईल, कॉर्पोरेट  चे  स्वरूप  येवून  नफा  वाढेल,  त्यासाठी  सर्व  जनतेने  जागरूकता  आवश्यकता  आहे  व  जे  कार्यक्षम कर्मचारी  अधिकारी  राहतील , कामचुकार  लोक  बाहेर  टाकले  जातील विमा  ग्राहक    विमा  एजेंट   yaani  गेल्या अनेक  वर्षात  जमा  केलेली लाखो  करोड़ो  ची  पूंजी  साल्वेणसी  गेरेंटी  भारत  सरकारची  असल्याने   त्यांना  स्वरक्षण  आहेच, 

प्रशांत बोरकर🤏🤏🤏🙏🙏🙏🙏मुक्त पत्रकार आर्थिक विमा विश्लेषक
8208361187
🤭🤭👆✍️✍️✍️
2/2/2020ला  एक  वर्षापूर्वी   लिहलेले  भाकित  म्हणा  लेख

Tuesday, March 22, 2022

रावेर बायपास सिंदखेड पाल रस्ता चांगला होणारराजद नेते श्री प्रशांत बोरकर यांच्या पाठपुरावा स यश


गेले अनेक महिने पासून आदिवासी भागाला आणि पाल पर्यटन स्थळं यास जोडणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता या रस्त्यावरून मध्यप्रदेश कडे जाणारी जड वाहतूक सुध्धा.होत होती.

परतू या मार्ग कडे दुर्लक्ष केले जात होते 
मागे पंचायत राज समिती आली तेव्हा शुधा या मार्गावरून न नेता खिरोदा सावदा मार्गे पाल कडे जाणे येणे केले होते अनेक  आमदार  मंडळीचे .त्यामुळे या रस्ता कडे दुर्लक्ष झाले होते.
श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना तसेच आदिवासी विकास विभाग यांना पत्र पाठवून या रस्तासह कुसुंबा भवानी माता मंदिराचे कडे जाणारा रस्ता चांगला
करण्याची मागणी केली तो रस्ता ही मंजूर झाला आणि काही काम वन विभाग करणार असल्याचे विस्वानिय वृत आहे

रावेर तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहे आणि निधी परत जातो या संदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पत्र लिहून  लक्ष वेधले होते हा रस्ता पावसाळा पूर्वी  दर्जेदार मजबूत होवून  आदिवासी ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते रशीद तडवी  रामकृष्ण चौधरी भाविक काटकर   वसंत महाजन राठोड. शशांक बोरकर सुभाष अकोले  यांच्या सह अनेक कार्यकर्ते कुसुंबा पाल शिंदखेड मुंजलवाडी भगातील ग्रामस्थ  यांनी  श्री प्रशांत बोरकर यांचे धडाकेबाज कामगिरी चे धन्यवाद व्यक्त केले आहे
तरुण तडफदार न्यूज ने यावर खास रिपोर्ट तयार करून प्रकाश झोत टाकला होता

Wednesday, March 16, 2022

होळीचे अध्यात्मिक पैलू- संत राजिन्दर सिंह जी महाराज

होळीचे अध्यात्मिक पैलू
- संत राजिन्दर सिंह जी महाराज

फाल्गुन महिन्यात सर्वत्र फुले उमलतात तसेच वातावरणात भव्य रंगी-बेरंगी बहर येतो. याच महिन्यामध्ये होळीचा सण फार आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. यात लोक एकमेकांना गळाभेट देउन होळीच्या शुभेच्छा देतात. ज्याप्रमाणे होळी सणाचा बाह्य पैलु म्हणजे एक दिवस होळी पेटवली जाते, तसेच दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग व गुलाल टाकून पारंपारिक पद्धतीने, हा उत्सव साजरा केला जातो. परंतु याचे एक अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे.

या जगात नेहमी एक असे चक्र चालू असते ज्यामध्ये सत्य आणि असत्य यांच्यात नेहमी युद्ध होत असतं. सत्याला दाबून टाकण्यासाठी असत्य खूप प्रयत्न करते, जेणेकरून ते सत्य कोणत्या न कोणत्या प्रकारे लपविले जाईल. परंतु सत्य अशी एक गोष्ट आहे जी कधीही लपून राहत नाही. कारण की पिता परमेश्वर सृष्टीच्या सुरुवाती पासूनच सत्य होते, आजही सत्य आहेत आणि सृष्टीच्या अंतापर्यंत सत्यच राहतील. होळीचा दिवस हे असं प्रतीक आहे - शेवटी सत्याचा विजय आणि असत्याचा नेहमी पराभव होतो.

पूर्ण संतांच्या मताप्रमाणे होळी पेटविण्याचे एक अध्यात्मिक महत्व आहे की आपण आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून सदाचारी जीवन जगावे. तसेच ज्या प्रकारे आपण बाहेर एकमेकांवर रंग व गुलाल टाकून हा उत्सव साजरा करतो, त्याच प्रकारे पूर्ण गुरूंच्या सहाय्याने ध्यान अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी प्रभुचे विविध रंग पाहून आपण होळी खेळूया.

या उत्सवाचा एक अन्य पैलू, एकमेकांना रंग लावणे हा सुद्धा आहे. या उत्सवाला लोक पांढरे कपडे परिधान करतात आणि याच्यात सुद्धा एक अध्यात्मिक पैलू आहे. त्या पांढऱ्या रंगात इतर अन्य रंग सुद्धा सम्मिलीत आहेत. याच प्रकारे परमेश्वर सुद्धा आपल्या अंतरी आहे. ज्याप्रकारे पांढरे रंग, सर्व रंगाचे स्रोत आहे, त्याच प्रकारे परमेश्वर सर्व सृष्टीचा स्रोत आहे.

ज्या प्रकारे होळीतील विविध रंग आपल्या कपड्यांवर अनेक रंगांच्या आकृत्या बनवितात आणि आपण त्या आकृत्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनात एकमेकांचा प्रेमपूर्वक स्वीकार केला पाहिजे. जर आपण एखाद्या देशाचे अथवा समाजाचे सदस्य आहोत, तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारे स्वीकारले पाहिजे, जसे पिता परमेश्वर सर्वांचा स्वीकार करतात.

 चला तर, होळीच्या उत्सवाला आपण सर्व आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून एकमेकांवर प्रेम व भातृभावाचा रंग टाकून, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश प्राप्त करूया.

Monday, February 14, 2022

LIC विमा पॉलिसी धारकांना 50टक्के बिमा एजंट यांना 25टक्के शेयर कोटा मिळावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रशांत बोरकर यांची मागणी


 मुंबई.
काल उशिरा lic मॅनेजमेंट ने सेबी ला lic आयपिओ चां प्रस्ताव दिला असून त्यात lic चे पॉलिसी धारक यांना दहा टक्के कोटा दिला जाणार आहे आणि कर्मचारी यांना पण काही कोटा दिला जाणार आहे परतू विमा प्रतिनिधी यांना काहीच उल्लेख नसून पंधरा लाख विमा प्रतिनिधी हे उन्हा पावसात  मेहनत करून जनतेच्या घरी चकरा मारून  lic ला परचंड संपती देशसेवा सुरक्षा साठी  जमा निर्माण करून दिली त्याचे साठी काहीच उल्लेख नसून विमा ग्राहक यांना पण दहा टक्के  कोटा हा खूप अपुरा आहे
तो किमान पन्नास टकके केला पाहिजे

एलआयसी चे  खरे मालक 95 टक्के हे पॉलिसी धारक आहेत पाच  टक्के सरकार आहे.
बुडालेल्या विमा पिफ कंपन्या   सरकारने  lic प्रबंधन यांना सोपवलेली दोन चार कोटी चे   भांडवलात lic agent  यानी जनतेच्या घराघरात जावून विश्वास संपादन करून आजची कोट्यवधी रुपयांची रक्कम देशाला अनेक पंचवार्षिक योजनेत पाणीपुरवठा रस्ते रेल्वे अश्या राष्ट्र उभारणीत दिली आहे त्याबाबत आजगायात बिमा ग्राहक यांना आणि सरकार ला भरघोस बोनस lic ने दिला आहे,  lic चे एजंट यांना केवळ कमीशन वर काम करावे लागते त्यांना  कोणताही प्रकारे कामगार कायदे मिळत नाही जेवढे काम  तेवढे मजुरी सारखे कमीशन मिळते त्यांना या इश्यू मधे काहीच कोटा दिला नाही त्यांना 25टक्के कोटा शेयर चा दिला पाहिजे व विमा ग्राहकांना किमान 50टक्के शेयर कोटा दिला पाहिजे, विदेशी गुंतवणूक ला कोणताही प्रकारे परवानगी देवू नये अशी भूमिका विमा ग्राहक प्रतिनिधी चळवळीचे अभ्यासक राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी स्पष्ट केली आहे.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...