Monday, July 20, 2020

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तालुकास्तरावरही अद्ययावत आरोग्य यंत्रणा- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
      तालुकास्तरावरही अद्ययावत आरोग्य यंत्रणा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
    अमरावती (जी मा का)   कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व्यापक करण्यासाठी विविध ठिकाणी अद्ययावत आरोग्य यंत्रणा, ट्रॉमा सेंटर्स सुरु करण्यात येत आहेत जेणेकरून ग्रामीण परिसरातील रुग्णांना तिथेच उपचार मिळू शकतील, अशी माहिती अमरावतीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

      जिल्ह्यात अचलपूर, तिवसा, नांदगावपेठ आदी ठिकाणी ट्रामा सेंटर्सच्या माध्यमातून प्रभावी उपचारांना गती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन, मोबाईल एक्स-रे यंत्रणा आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उपचारप्रणालीत अधिक सुसूत्रता व गती आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पीडीएमसी व शहरी भागातील रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन्ही रूग्णालयांलगतच्या परिसरात क्वारंटाईन सेंटर ठेवण्याचा प्रयत्न आहे. व्हीएमव्ही महाविद्यालय येथे स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात येत आहे.

                        मनोबल उंचावण्यासाठी उपक्रम

           कोरोनाबाधित, विलगीकरणात असलेले रुग्ण, संशयित यांचे मनोबल उंचावण्यासाठी झूम आदी डिजीटल माध्यमांचा वापर करून मानसिक व्यवस्थापनासंबंधीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आर्ट ऑफ लिव्हिंग व इतर संस्थांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचेही श्री. नवाल यांनी सांगितले. विलगीकरणाच्या काळात, तसेच बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांच्या विलगीकरणाच्या काळात, कुटुंबियांच्या मानसिक व्यवस्थापनासाठी प्रयत्न होत आहेत. जागरूक नागरिकांनीही या कामात सहभाग द्यावा. त्यासाठी विविध परिसरात समित्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनीही योग्य दक्षता, उपचारप्रणाली याची माहिती घेऊन आवश्यक दक्षता घेत कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
00000बातम्या व प्रमोशन मार्केटिंग 8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...