Friday, July 3, 2020

रावेरST आगारात सेवा निवृत्ती कार्यक्रम संपन्न*

*
रावेर (प्रतिनिधी) येथील 
रावेर आगारातील दोन कर्मचारी सेवा निवृत्ती झाले. त्यांचा निरोप समारंभ  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रावेर आगारात पार पडला. येथील शेख यासीन शेख अवलीया (चालक क्र ५५५)व श्री ज्ञानेश्वर 
श्रावण 
साळुंके( वाहक क्र ११८७) यांनी आपली सेवा यशस्वी रित्या पुर्ण केली श्री यासीन शेख यांची सेवा ३० वर्षे तर श्री साळुंके यांची सेवा २८ वर्षे झाली.
आपल्या अध्यक्षतील व गौरवपुर्व भाषणात आगार प्रमुख श्री बेंडकुळे यांनी निवृत्तीच्या अनुभवाचे महत्त्व विशद केले. तसेच त्यांनी एस टी. महामंडळाने सुरु केलेल्या माल वाहतुक सेवेला नागरिक व्यावसायिक, व्यापारी, यांनी भरभरुन प्रतिसाद घ्यावा व संकटकाळात साथ द्यावी असे भावनिक आवाहन केले. सदर प्रसंगी कामगार संघटना, कास्ट्राईब यांत्रिक संघटना, कामगार सेना व इंटक सेना यांच्या वतीने निवृत्तीच्या सत्कार करण्यात आला. यावेळी आगार प्रमुख निलेश बेंडकुळे अध्यक्ष स्थानी होते. सुत्रसंचालन एम बी चौधरी यांनी प्रभावी पणे केले. एस पी चिनावले यांनी आठवणींनी उजाळा दिला या वेळी यासीन शेख यांचे चिरंजीव प्राध्यापक मोईन शेख यांनी मनोगत व्यक्त केले. 
सर्वांनी मास्क लाऊन व फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...