Tuesday, July 14, 2020

धारावी_पोलीस_तुमचा_अभिमान_आहे सुमारे_15_लाख_लोकवस्ती_असणाऱ्या_धारावीत #covid19_कोरोनावर_नियंत्रण., फुकटचे श्रेय घेणारेवरसोशल मीडियावर चांगलीच टीका

#धारावी_पोलीस_तुमचा_अभिमान_आहे.
👍👍🙏🚔🙏👍👍🙏🚔🙏👍👍🚔🙏👍👍
#सुमारे_15_लाख_लोकवस्ती_असणाऱ्या_धारावीत 
#covid19_कोरोनावर_नियंत्रण.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आपले महाराष्ट्र राज्य , देश नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या धारावी परिसरात कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात धाराविकारांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा धारावी पॅटर्न समोर आला आहे.

धारावीत कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून हे यश दृष्टीक्षेपात आहे आहे. या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी देखील मौलिक कामगिरी केली याचा आपल्याला #अभिमान #असल्याचे_महाराष्ट्र_राज्याचे_गृहमंत्री_श्री_अनिल_देशमुख #सर_यांनी_म्हंटले_आहे.
कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने WHO दखल घेतली आहे. ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरवातीपासूनच पोलीस यंत्रणेने नागरिकांना विविध माध्यमातून जागरूक करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे पोलीसांचा मोठा वाटा या यशामध्ये आहे असे गृहमंत्री सर म्हणाले. 
धारावीमध्ये कोरोना शिरकाव झाल्यावर पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती. त्यामुळे कर्तव्य करणे खुप कठीण होते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलीसांनी विविध माध्यमातून जनजागृती केली, पोलीसांच्या गाडीतून तसेच अत्याधुनिक ड्रोन च्या ध्वनिक्षेपक मधून योग्य माहीती देऊन लोकांना जागृत करणे. अत्याधुनिक ड्रोन मुळे जवळपास चार किलोमीटरचा परिसर कव्हर होत होता. तसेच काही प्रसंगी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना समजावून सांगून कोरोनाचे काय दुष्परिणाम आहेत याची माहिती देण्यात येत. तसेच कोरोनाला कसे हरवले पाहिजे, त्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतील याबाबतच्या क्लिप्स व्हाट्सअप्प ग्रूप द्वारे, ध्वनिक्षेपक द्वारे नागरिकांना पोहचविल्या जात. अरुंद रस्त्यातून पायी चालत गस्त घालून लोकांमध्ये जनजागृती केली. 

कोरोनामध्ये लोकांच्या दैनंदिन गरजा हे देखील पोलीसांपुढे आव्हान होते. सर्व दुकानदार यांना बोलावून सोशल डीष्टसिंग चे महत्त्व पटवून देऊन त्यानुसार लोकांना किराणा, भाजीपाला द्यावा अशा स्पष्ट सूचना दिल्या. भाजीपाला, मटण, चिकन यांची दुकाने मोकळ्या जागेत हलवली. याचाही फायदा नक्की झाला. धारावीतील 25, 30 खानावळ लोकांना बोलावून घेऊन लोकांना घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करण्यासाठी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे या परिसरातील सामाजिक संस्थाच्या माध्यमातून दररोज 25 ते 30 हजार लोकांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. धारावी परिसरात बिहारी लोक व्यवसायानिमित्त राहत असल्याने त्यांनाही बिहारी जनता असोसिएशन मार्फत बोलावून सूचना दिल्या व मदत केली. महत्वाचे म्हणजे पोलीसांनी धारावीच्या विविध भागातील प्रत्येकी 2-2 स्वयंसेवक यांना बोलावून कोरोना बद्धल सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्फत देखील गर्दीवर नियंत्रण मिळवले असल्याचे गृहमंत्री साहेबांनी सांगितले. 
#धारावी_पॅटर्न_यशस्वीपणे_राबविणारे_धारावी_पोलीस #ठाण्याचे_वरिष्ठ_पोलीस_निरीक्षक_श्री_रमेश_बाबुराव_नांगरे  #व_त्या_ठिकाणी_नेमणुकीचे_सर्व_पोलीस_अधिकारी, #कर्मचारी_स्वयंसेवक_यांचे_काम_खरच_खूप_कौतुकास्पद #आहे.
🇮🇳🇮🇳 #सॅल्यूट_धारावी_पोलीस 🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳 #जयहिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 
#Visit_Facebook_Page
#महाराष्ट्र_पोलीस_वर्दीतला_माणूस
#अभिजीत_मुळे_सोलापूर_ग्रामीण
#
 योग्य लोकांना श्रेय मिळून चांगले काम सुरू राहावे यासाठी तरुण तडफदार  धारावी पोलीसटीम  व जनता याचे त्याचे अतुलनीय कामासाठी सलाम करीत आहे,,,

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...